प्रतिनिधी:(जालना)जिल्हृयासह तालुक्यातील मानेगाव खालसा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई सखाराम राठोड,उपसरपंच राधिका दत्तात्रय जाधव व ग्रामपंचायत सदस्य नारायण लक्ष्मण जाधव,रोहिणी गोरक्षनाथ गायकवाड,कैलास रामचंद्र चव्हाण,बळीराम भीमा पवार,रेखा गौतम लहाने,अनुुसयाबाई प्रल्हाद राठोड,बाजीराव नागोराव आचलखांब,गयाबाई विलास आचलखांब यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या वतिने करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वातील सरकार ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचयत मध्ये भाजपला बहुमत मिळवून दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्य व कोळसा व खनिज मंत्री रावसाहेब पाटील दानवे,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे,आ.नारायण कूचे,माजी आमदार विलास खरात,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,समृध्दी कारखाना चेअरमन सतीश घाडगे,माजी सभापती भिमराव डोंगरे यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष वसंतरावजी शिंदे आणि भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना