किनगाव माध्यमिक विद्यालयात अमिर प्रतिष्ठानतर्फे २१ अपेक्षीत वाटप

 

यावल( प्रतिनीधी) विकी वानखेडे

भारतीय प्रजासत्ताक चे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त आमिर प्रतिष्ठान संचलित अमीर कला व वाणिज्य महाविद्यालय किनगाव यांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष हाजी रमजान अमीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन तडवी यांनी माध्यमिक विद्यालय किनगाव येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत २१ अपेक्षित संच वाटप केले कार्येक्रमाच्या सुरूवातीला सरस्वती पुजनासह भारतरत्न लालबाहादुर शास्री यांचे प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्या.जळगाव चे ज्येष्ठ संचालक उमाकांत रामराव पाटील स्कूल कमिटी चेअरमन निळकंठ रामदास पाटील किनगाव बुद्रुक चे सरपंच पती संजय सयाजीराव पाटील किनगाव खुर्द चे सरपंच भूषण नंदन पाटील माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी माजी आमदार रमेशदादांचे स्वियसहाय्यक समिर गुलशेर तडवी ग्रा.प.सदस्य विजय अरूण वारे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सूत्रसंचालन एस.बी.सोनवणे सर यांनी केले यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Comment