प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद अंतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
दि. ६ जानेवारी रोज शुक्रवार ला शिवाजी पार्क हिंगणघाट येथे लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी विविध उपक्रम घेऊन प्रतीज्ञा घेतली.
सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करिता शीला बोरकर (व्ही. एम विकास संस्था), क्षमा सुटे (वकील), प्रतिभा दुधबडे ( पोलीस अधिकारी), श्री कुणाल दुर्गे (वकील), डॉ. गुजर सर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता जावळे (शहर अभियान व्यवस्थापक ) न. प. हिंगणघाट यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी कटारे व सुलभा इंदुरकर (समूह संघटिका ) न.प. हिंगणघाट यांनी केले
कार्यक्रमाला शक्ती शहर स्तर संघ च्या अध्यक्ष अनु मानकर, उपाध्यक्ष – निर्मला भोंगाडे
सचिव – शीला राजूरकर, सहसचिव कलावती इतनकर व इतर सदस्य उपस्थित होते . – कार्यक्रमाला एकूण ४६५ महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाची रॅली शिवाजी पार्क पासून ते नगर परिषद हिंगणघाट पर्यंत काढण्यात आली.