प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात देशातील पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षणाची जननी माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त फोटोचे पूजन करत फोटोला माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दिवप्रज्वल करून करण्यात आली.
स्त्रीच्या भोवती असलेले परंपरेचे घट्ट फास मोकळे करीत मानवतेला जाग करून समाज धडवणारी क्रांती म्हणजे सावित्रीबाई होय. तिच्या कष्टाच चीज आजच्या काळात व्हायला हवा म्हणून क्रांतीज्योती समजून घेणे गरजेचे आहे.
असे मनोगत यावेळी अमोल त्रिपाठी यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अमोल त्रिपाठी, युवक जिल्हा सचिव शेखर ठाकरे, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष वैभव साठोने, तालुका संघटक आकाश बोरीकर, शहर उपाध्यक्ष अमित मुळे, सचिन पाराशर, प्रशांत मेश्राम, संजय गायधने, रोशन देवतळे, मो.शाहिद, निखिल ठाकरे, अभय सावरकर, यश मेसेकर, वैभव भुते, नंदकिशोर काळे, अंकुश दरोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.