अजित पवार यांच्या वक्तव्य नंतर संग्रामपुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरवट बकाल येथे निषेध आंदोलन

 

राष्ट्रवादी चे नेते तथा विरोधीपक्षनेते श्री अजितदादा पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी जी भुमिका मांडली ती तमाम हिंदू च्या विरोधातील असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आक्रोशीत आहे.

धर्मासाठी मुघलांचे अमाप क्रुर अत्याचार सहन करुन सुध्दा धर्म परिवर्तनाचा विरोध करुन हिंदू धर्मासाठी बलीदान करणारे छत्रपती संभाजी महाराज यांना त्याकाळापासुन धर्मवीर म्हणून ही उपाधीच समाजाने दिली.

मा अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे विधान केले या विधानाने महाराष्ट्रातील जनता नाराज असुन श्री अजितदादा पवार यांनी जाहीर माफी मागावी व आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा,या मागणीसाठी संग्रामपुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरवट बकाल येथे निषेध आंदोलन केले.

यावेळी अजित पवार मुर्दाबाद,चे नारे लावत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चौक दणानुन सोडला.

यावेळी भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष श्री लोकेश राठी, भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष श्री जानराव देशमुख, भाजपा नेते श्री पांडुरंग हागे, डॉ गणेश दातिर,भारत वाघ,सुधाकर शेजोळे, ज्ञानदेव भारसाकळे, सुभाष हागे, अंबादास चव्हाण,प्रकाश गोतमारे,सुधिर लव्हाळे, रमेश खोकले, विनोद भिवटे, रामदास म्हसाळ, सचिन अग्रवाल,अमोल कुकडे,प्रतिक वडोदे,पवन अस्वार, वासुदेव सडतकार,लोणे , सौरभ शिरस्कार, ऋषिकेश कोकाटे,पुंडे,यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment