जेईएस महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन:

 

(तुकाराम राठोड)

जालना-जेईएस महाविद्यालयात सायन्स फोरम च्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्द्घाटन आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, सायन्स फोरम प्रमुख प्रा. डॉ. राजेश सरकटे, प्रा. डॉ. जवाहर काबरा, प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. डॉ. सुखदेव मांटे आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेमध्ये जवळपास 52 स्पर्धकांनी भाग घेतला.
पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धेचे परीक्षक प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी प्रेझेंटेशन कसे करावे व त्याचे मुल्यांकन कसे केले जाते

याच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी संशोधन हे नावीन्यपूर्ण व समाजाभिमुख असले पाहिजे असे म्हटले.

तसेच अशा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी व भिन्न विषयाचे पोस्टर घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. सुशांत देशमुख यांनी स्पर्धेमध्ये बक्षीस न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील स्पर्धेत चांगला विषय घेऊन सहभागी होण्याचे आव्हान केले.

स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अंबिका कोपले व विशाखा सरोदे यांना तर द्वितीय पारितोषिक लक्ष्मण शिंदे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ 5 स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुशांत देशमुख, प्रा. डॉ. उमेश मोगले व प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जान्हवी शिरले व श्रावणी कुलकर्णी ने केले तर उपस्थितांचे आभार साक्षी चौंडिये हिने मानले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. जी. बी. कुलकर्णी, प्रा. डॉ. गणेश रोकडे, प्रा. डॉ. आमोल खांडेभराड, प्रा. संतोष मुंदडा, प्रा. स्वप्ननिल सारडा, प्रा. अरविंद महाजन, गजानन घोडके, सचिन जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment