शेगांव: इस्माईल शेख(प्रतिनिधी):
२५ डिसेंबर २०२२: सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने शाखा शेगांव तर्फे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनचे ७५ श्रद्धाळू भक्त तथा सेवादारांनी निस्वार्थ भावानी रक्तदान केले. रक्त संकलनाकरिता उपजिल्हा रुग्णालय शेगाव व जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील डॉक्टर चमू उपस्थित होती.
या शिबिराचे उदघाटन आ.समाधान सोनवणे तहसीलदार शेगाव यांचे शुभ हस्ते करण्यात आले त्यांनी रक्तदान करिता येणाऱ्या रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले आणि मानाव कल्याणकरिता रक्तदानाची जी सेवा करीत आहेत त्यांची प्रशंसा केली.
याव्यतिरिक्त श्री संतोषजी शेगोकार संयोजक तथा ज्ञानप्रचरक जिल्हा बुलडाणा जी यांच्याद्वारे रक्तदान शिबिरामध्ये आलेले गनमान्य अतिथी सी.आर .मिटकरी, सुलताने पतंजली योगपीठ साहित डॉक्टर व त्यांची चमू तथा रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले मिशन कडून प्रथम रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये वार्षिक निरंकारी संत समागमाच्या निमित्ताने केले होते त्यावेळेस बाबा हरदेवसिंगजींनी या शिबिराचे उदघाटन केले
आणि मानवतेला हा संदेश दिला की रक्त नालीमध्ये नाही नाडीमध्ये वाहायला पाहिजे.संत निरंकारी मिशनचे सेवादार हा संदेश चरितार्थ घेऊन दिवसरात्र मानवमात्रांची सेवेमध्ये तत्पर आहेत. जनकल्याणाकरिता निस्वार्थी भावाने निरंतर सेवेत कार्यरत आहेत
संत निरंकारी मिशन हे मानवकल्याणाकरिता वेळोवेळी सेवेमध्ये कार्यरत आहेत की ज्यामध्ये मानवतेचा विकास होईल. यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विनामूल्य आरोग्य निदान शिबीर, नेत्र शिबिर, नैसर्गिक आपत्ती मध्ये जरूरतमंदाना सहायता केली जाते. या सर्व सेवांकरिता राज्य सरकार कडून वेळोवेळी मिशनची प्रशंसा केली जाते आणि सन्मानित केले जाते.
सदर रक्तदान शिबिर हे या वर्षामधील दुसरे रक्तदान शिबीर आहे. प्रथम रक्तदान शिबीरामध्ये ८५ पिशव्या रक्तदान शिबिर झाले आहे.