भाजपा भटके विमुक्त आघाडीचे नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन-मा.आ. नरेंद्र पवार.

—————————————-
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थीत रहावे – डॉ.रमेश तारगे
—————————————-
जालना(प्रतिनीधी)भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर येथे आयोजित करण्यात आले.

असून,या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश तारगे यांनी केले आहे.

नागपूर येथील भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर,मंत्री अतुलजी सावे,मा.खा.डॉ.विकास महात्मे,खा.प्रीतमताई मुंडे,आ.श्रीकांत भारतीय,भिकुजी विधाते,विश्वास पाठक,अतुल वझे,रामेश्वर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे.युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी.तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी हे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे.

या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे संपूर्ण राज्यातून व प्रत्येक जिल्ह्यातून महिला,युवक,युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असेही डॉ.तारगे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment