Wardha सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट :- दि.05 डिसेंबर रात्री 8 वा. सुमारास फिर्यादी हा झाशी राणी चौक, हिंगणघाट येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना दोन अज्ञात मोटरसायकल वरील इसम फिर्यादीचे मागुन येवुन त्याचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन गेल्याचे फिर्यादीचे पो स्टे ला दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून अपराध क्र. 1280/2022 कलम 392, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला .
हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे। पथक प्रमुख पो.हवा, शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व मोबाईलबाबत शोध घेतला असता सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षीत बालक दोन्ही रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यांनी हिसकावुन नेल्याची माहिती वरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली.
असता त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यांचे कडुन एक विवो कंपनीचा अन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्या करीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. एमएच-34/ क्यु- 4358 असा आरोपी व वि.सं.बा. यांचे ताब्यातून जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास अटक केली.
सदर गुन्हयातील आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता, त्यास जबरी चोरी करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पो.स्टे. गिरड हद्दीतील कोरा गावातून चोरल्याची कबुली दिली तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षीत बालकासह जिल्यातील व बाहेर जिल्यातील विविध प्रकारच्या 7 मोटसायकल व 2 मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन 7 मोटरसायकल, सदर गुन्यात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन चोरलेले मोबाईल असा एकूण किमंत 1,93,000 / रु. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि सोमनाथ टापरे डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर व पो.शि. संतोष गिते व सायबर पोस्टे चे नापोशि दिनेश बोथकर यानी केली आहे.