आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि.२८नोव्हेंबर
हिंगणघाट :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नगरपरिषद हिंगणघाटच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जी. बी. एम .एम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्लॅब व छताचे पाणी मुरल्यामुळे लावण्यात आलेल्या सिलिंग सीट पडले हे माहीत झाल्यावर शिव सेनेच्या वतीने पाहणी केल्यावर आमच्या पाहणीत आले कि या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे दरवाजे, सिलिंग च्या शीट,शौचालय चे बोगस काम करण्यात आले आहे हे आमच्या निर्देशनात आले म्हणून
त्या करिता वर्धा जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे तथा बाळाभाऊ शहागडकर ,यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सोनोले मॅडम यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतांना वर्धा जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक श्रीधर कोटकर, मनीष देवडे ,भास्कर ठवरे ,बंटी वाघमारे ,शंकर मोहम्मारे ,शहर संघटक मनोज मिसाळ,यांचे उपस्थितीत होते. निवेदन देण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असता शाळेचे काय आर्थिक नुकसान झालेले आहे . तेथील सर्व फोटोग्राफ घेण्यात आले व पडलेल्या भागाची पाहणी करण्यात येऊन , तिथे विद्यार्थ्यांची विचारपूस करून चौकशी केली असता कुठलीही जीवित हानी झाली नाही याची खात्री करून घेतली. पंरतू नगर परिषदेने तब्बल चार वर्षांपूर्वी आराखडा मंजूर करून, नगरपरिषदची शाळा नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले होते. त्या बांधकामा करिता शासनाकडून 8 कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले व ती शाळा नव्याने बांधण्यात आली व तिचे लोकार्पण घाईघाईने केंद्रीय मंत्री श्री .नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले .स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्थानिक लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व येथील लोकप्रतिनिधी(आमदार) तसेच नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता इमारत लोकार्पण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली .परंतु सदर इमारतीत एवढा दोष असतांना सुद्धा येथील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची या लोकप्रतिनिधीना व प्रशासनाला कोणी अधिकार दिला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद चे मुख्यधिकारी यांनी आपल्या विभागा कडून जाहीर स्पष्टीकरण दिले की, कंत्राटदाराचे सुरक्षा राशी जमा ठेवलेली आहे .परंतु आमचे म्हणणे असे आहे की, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सुरक्षा राशी असून सुध्दा एकाद्या विद्यार्थी चा जीवितहानी झाली तर ती भरून निघेल का ? याबद्दल मुख्याधिकारी साहेबांनी, खुलासा करावा यानंतर देखील अशा परिस्थितीत असे लक्षात येते की, या घटना पुनश्य: होऊ शकते.याला नाकारता येत नाही, याचे कारण आम्ही जरी टेक्निकली नसलो तरी वरतून छताचे जे पाणी टीप टीप गळत आहे त्यावरून असे आम्हाला जाणवले. यावेळी जीवित हानी झाली नाही परंतु असे काही घडल्यास याला जबाबदार कोण राहील याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी कंत्राटदार व लोकप्रतिनिधी आमदार यांनी द्यावी! अन्यथा लोकार्पण घेणाऱ्या आमदार,नगराध्यक्ष, कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.असे केले नाही तर आम्ही शिव सैनिक मुख्याधिकारी साहेबांचा घेराव करू हे मात्र नक्की.निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे उपशहर प्रमुख- संजय पिंपळकर, शंकर झाडे, जयंत रोहनकर, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गूळकरी,विभाग प्रमुख – रुपेश काटकर, सचिन मुळे, मोहन तुमराम,नितीन वैद्य, दिनेश धोबे,अनंता गलांडे, सुनील आष्टीकर,दिलीप चौधरी, आशिष जैस्वाल,देवा शेंडे, भास्कर मानकर,हिरामण आवारी,बलराज डेकाटे,चंदू भुते, गोवर्धन शाहू मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Comment