अकोला राणी सती यांचा753 वा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने दिपोत्सव लावून साजरा

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला येथील सामाजिक तसेच अध्यात्म ,भक्ती, श्रद्दे सोबत मानवतेचे कार्य राणी सती दादी भक्त .त्यांच्या प्रेरणेने करीत असल्यामुळे 753 वर्षानंतर सुद्धा त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो ही संस्कृती व परंपरा मातृ शक्तीने राजस्थान पासून महाराष्ट्र पर्यंत देशातील कोणाकोपऱ्यामध्ये पोहोचून ते कार्य केल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका चंदादेवी हरिप्रसाद तिवारी यांनी केले.गजानन महाराज यांच्या पावनस्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात गेल्या 80 वर्षाच्या परंपरेनुसार श्री राणी सती दादी यांचा जन्मोत्सव आवळा नवमीला साजरा करण्यात येतो या निमित्ताने श्री राणी सती दादी चे मंगल पाठ चार अध्यायाचे पठण सामूहिकरीत्या माञुशक्तीने करून भक्ती आणि श्रद्धेच पालन केलं यावेळी महाआरती व विशेष पूजा अर्चना करण्यात आली सुमन अग्रवाल , मंजू झुंझुनवाला हरिप्रसाद तिवारी निर्मला पंडित संगीता अग्रवाल विशाखा पोद्दार रतन गिरी माधव मानकर अजय गुल्हाने, जनक जोशी आदींनी कार सेवा करून उत्सव साजरा केला यावेळी विशेष पूजा अर्चना पंडित चेतन शर्मा गिरीश जोशी झलक शर्मा संतोष शुक्ला यांनी केली

Leave a Comment