किनगाव प्रा.आ.केंन्द्रात कोरोणामुळे जिव गमावलेल्या व्यक्तीच्या आठवणीसाठी केले वृक्षारोपण-डाँ.मनिषा महाजन यांचा अनोखा उपक्रम

 

यावल ( प्रतिनीधी.) विकी वानखेडे

 

किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांच्या अभिनव उपक्रमातुन व किनगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या सहकार्याने “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कोव्हीड १९ या महामारीमुळे जिव गमावलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून वृक्षारोपणाचा उपक्रम गुरूवार दि.२० रोजी प्रा.आ.केंन्द्राच्या आवारात राबविण्यात आला ज्यांच्या घरातील व्यक्तींचा कोव्हीड १९ मुळे मृत्यु झाला ते अनपेक्षितच होते परंतु त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले झाडे जगली तर माणसे जगतील असा संदेश या उपक्रमाद्वारे डॉ.मनिषा महाजन यांनी दिला कोविड १९ मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या हस्ते या कार्येक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यात वत्सला तायडे,निलेश रामदास पाटील,अनिल शिंपी,नंदा महाजन,सुशीला रमेश चौधरी या मृत व्यक्तीची आठवण म्हणून प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आले.यावेळी कोरोणामुळे जिव गमावलेल्या अनिल शिंपी यांच्या पत्नी भाऊक झाल्या व त्यांनी सांगीतले की जेव्हा जेव्हा मी प्रा.आ.केंन्द्रात येईल तेव्हा तेव्हा माझ्या पतींची आठवण म्हणून हे झाड साक्ष देईल असे आशा शिंपी यांनी सांगितले व या उपक्रमाबद्दल डॉ.मनिषा महाजन यांचे कौतुक करत आभारही मानले यावेळी सरपंच सौ.निर्मलाताई संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.दोन वर्षांनपुर्वी अनपेक्षीतपणे कोरोनाची लाट आली आणी काहींच्या आयुष्यात अंधार करूण गेली मी आरोग्यसेवा देत असतांना माझ्या डोळ्यांनी हे पाहीले म्हणून कोरोनामुळे जिव गमावलेल्या व्यक्तींच्या परीवाराच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून वृक्षारोपणाच्या कार्येक्रमाचे
आयोजन केल्याचे डाँ.मनिषा महाजन यांनी यावेळी सांगीतले.
डॉ.मनिषा महाजन या नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात व परीसरातील रस्त्यावर अपघातग्रस्तांना महीला डाँक्टर असुन देखील वेळ न पहाता अपघातस्थळी आरोग्यसेवा देतात म्हणून त्यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून डाँ.मनिषा महाजन यांचे कौतुक होत आहे या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.आ.केंद्राचे
आरोग्य सहाय्यक राजेश सुरवाडे आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील आरोग्य सेविका एस.आर.जमरा आरोग्य सेवक दिपक तायडे,जिवन सोनवणे,विठ्ठल भिसे,पवन काळे परीचर सरदार कनाशा,स्वाती बोराडे स्विपर निलेश कंडारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment