छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न:

 

प्रतिनिधी:(संभाजीनगर)दिशा समिती अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक झाली.त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी दिशा समिती सह अध्यक्ष म्हणून केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड उपस्थित होते.रावसाहेब दानवे यांनी प्रत्येक घटकांच्या शेवटच्या माणसांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना कश्या पोहचतील,त्याला लाभ कसा मिळेल याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी दिशा समिती सह अध्यक्ष खा.इम्तियाज जलील,जिल्हाधिकारी श्रीआस्तिक कुमार पांडे,आ.हरिभाऊ नाना बागडे,आ.रमेश बोरनारे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,महापालिका आयुक्त अभिजित चौधरी,जि.प.सदस्य स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थिती होते.

Leave a Comment