यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटकाजवळ आलेल्या तरूणी आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे सदर तरूणी असा प्रसंगी आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली असुन , याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की , मिनल निवृत्ती भागवत क्य२३ वर्ष राहणार नविन प्लाट क्षेत्र अंजाळे तालुका यावल या तरुणीने दिनांक १५ आक्टोबर २o२२ रोजी सकाळी १oवाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत क्य५८ वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे . सदरच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होता अशी माहीती मिळत आहे त्यामुळे विवाहची वेळ जवळ आली असता तरुणीने आत्मह्त्वा का केली असावी असा प्रश्न उपस्थित होते . दरम्यान मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश पवन जैन यांनी केली