विकासाच्या प्रश्नावर आपण राजकारण करत नाही,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन.

 

2.सातोना खुर्द व वरफळवाडी ता.परतूर येथे 01 कोटी 45 लाख रुपयांच्या कामाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

3.सातोना जिल्हा परिषद सर्कल मध्ये भाजपचा उमेदवार निवडून द्या,निवडणूक होताच दोन कोटी रुपयांचा निधी सतोना गावच्या विकासासाठी देणार.

4.सातोना येथील नागरिकांना आमदार लोणीकरांचे आश्वासन.

5.मतदार संघातील 200 गावांमध्ये सामाजिक व धार्मिक कार्यासाठी सभागृह बांधले.

6.देवेंद्र फडणवीस,नितीनजी गडकरी,सुधीर मुनगुंटीवार यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी 4700 कोटीचा निधी आणला.

7.पूल व रस्त्याच्या कामासाठी 01 कोटी 20 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल आमदार लोणीकर,अन्वर देशमुख यांचे वरफळवाडी येथील ग्रामस्थांनी मानले आभार.

8.वॉटर ग्रीड कार्यान्वित होण्यापूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये मतदार संघामध्ये 25 कोटी रुपयांचे आर ओ प्लॅन ग्रामपंचायतीना उपलब्ध करून दिले.

प्रतिनिधी(जालना)विकासाच्या कामात आपण कधीच राजकारण केलेले नसून विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेसोबत असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते सातोना खुर्द व वरफळवाडी तालुका परतुर येथे 01 कोटी 45 लक्ष रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते ऍड अनवर देशमुख यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माधवराव कदम भा ज पा ता अध्यक्ष रमेश भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून दिल्यास सातोन्यातील नागरिकांना दोन कोटी रुपयांचा निधी विकासासाठी तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.
वॉटर ग्रीडयोजना कार्यान्वित होण्यापूर्वी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतींना 25 कोटी रुपये निधीचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठीचे आरो प्लांट उपलब्ध करून दिले होते असे सांगतानाच वरफळ वाडी येथील प्लॅन सुरू आहे की नाही यासंदर्भात त्यांनी विचारणा केली प्लॅन सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगताच याबाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा भार सांभाळत असताना परतुर विधानसभा मतदारसंघासाठी वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणली त्याचबरोबर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तात्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला
या निधीच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचा गजानन महाराजांच्या शेगाव पासून तर पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत रस्ता बांधण्याचं काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्यामार्फत आपण मंजूर करून आणले व मतदार संघाचा विकास साधला
मतदार संघातील प्रत्येक रस्ता डांबरीकरणाने कसा जोडता येईल यासाठी प्रयत्न करत असताना मतदार संघातील प्रत्येक रस्त्याला डागरीकरणाच्या माध्यमातून जोडण्याचे काम आपण मंत्री असताना प्राधान्याने केले असे सांगत असतानाच अनेक गावातील कार्यकर्ते नियमितपणे मागणी करायचे धार्मिक कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यक्रमांची कार्यक्रमासाठी सभागृह पाहिजे कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण करताना 200 च्या वर गावांमध्ये सभा मंडपाचे बांधकाम आपण मंत्री असताना केले मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि आघाडीचे सरकार सत्तेत आले कोरोना सारखी महाभयंकर महामारी ही जगासह देशात थैमान घालत होती या महामारीचा मुकाबला करण्यासाठी माझ्या फंडातून मी स्वतः 25 लक्ष रुपये कोरोना महामारीतील अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारची उपकरणे खरेदी करण्यासाठी दिले.
वॉटर ग्रीड सारखा महत्वकांक्षी प्रकल्प मतदार संघात उभा करून मतदार संघातील प्रत्येक गावाला स्वच्छ निर्मळ फिल्टर चे पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले आज या वॉटर बीडच्या माध्यमातून जवळपास परतुर तालुक्यातील शंभर तर नेर शेवली व मंठा तालुक्यातील 40 ते 50 गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मतदार संघातील प्रत्येक गावाला स्वच्छ व निर्मळ पाणी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
दरम्यान आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळवाडी गावासाठी सांस्कृतिक सभागृह शाळा खोल्या आरो प्लांट आधीच अनेक विकास कामे केली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले.
आपल्या 42 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण राजकारण करीत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठेही राजकारण केलेले नसून विकास कामाला आपला सदैव पाठिंबा राहिला असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
या प्रसंगी वरफळवाडी तालुका परतुर येथील 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या पूल व रस्त्याच्या कामाचे तसेच सतोना खु येथे नागरी सुविधे अंतर्गत सिमेंट रस्ता नाली बांधकाम 20 लक्ष रु, शाळा खोली दुरुस्ती 4 लक्ष रु आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Leave a Comment