सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- राहुल फुलमाळी रा.पारडी येथील र्शेतकऱ्याने उमा राजू मंडलवार रा. हिंगणघाट यांचे मोजा सातेफळ येथील शेत विकत घेतले . शेती विकत घेताना 2.43 या शेतावर एक लाख रुपये बँक ऑफ इंडिया हिंगणघाट यांचे कर्ज होते. यातील 1.21 शेत दि.11.8.3022 ला विकत घेतले. फेरफार घेताना पटवारी यांनी यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे फेरफार घेतला नाही . संबंधित प्रकरणाची माहिती घेतली असल्यास या मध्येबँकेचा बोझा असलेल्या जमिनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 47 नुसार बँकेच्या संमती/ परवानगी शिवाय हस्तानंतरन करता येत नाही.
शेतकऱ्यांना बँकाना गहाण असलेल्या जमिनीचे वाटणीपत्र , बक्षीसपत्र, विक्रीपत्र अथवा कोणत्याही प्रकारचे हस्तानंतरन करायचे असल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 47 नुसार संबंधित बँकेची परवानगी घेणे आवश्यक असतांना स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयातून दलाला मार्फत शेतकऱ्यां कडून स्वतःचे खिसे गरम करुन नियमबाह्य पद्धतीने दस्त नोंदणी केल्या जात आहे. अश्या नोंदणीकृत दस्ताचे ई फेरफार निर्गतिकरण करतांना तलाठी, मंडळ अधिकारी फेरफार नामंजूर करीत असल्यामुळे शेतकऱ्याने या व्यवहाराकरिता शासनाकडे भरलेला लाखोचा मुद्रांक शुल्क वाया जात असुन, ठरलेल्या व्यवहारातील जमिनीच्या मोबदल्या पासून शेतकरी वंचित राहून त्याची आर्थिक कोंडी होतं आहे. वास्तविक निर्बंधित सत्ताप्रकारातील जमिनी सिलिंग, कुळ कायद्या अंतर्गत, भुदान, सरकारी पट्टेदार, लाभ क्षेत्रातील जमिनी अश्या जमिनीचे व्यवहाराची निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करतांना सक्षम प्राधिकरणाची परवानगी सादर करणे बंधनकारक आहे. परंतु हिंगणघाट शहरात दलाल,अर्जविनिस मार्फत दुय्यम निबंधकांशी संगणमत चिरीमिरीचा व्यवहार करून शेतकरी वर्गाची आर्थिक फसवणूक करीत असल्यामुळे स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयाची उच्च पातळीवर चौकशी करुन दोषी वर कारवाई करण्याची मागणी फसवणूक झालेले शेतकरी करीत आहे
देविदास यादवराव हेमने (मंडळ अधिकारी:- हिंगणघाट) :- बँकेचा बोझा आहे बोझा कमी करून
आना .
गाढवे मॅडम (दुय्यम निबंधक अधिकारी) :- उमा राजू मंडलवार यांचे 2.43 शेत जमीन यापैकी 1.21 शेत जमीन विक्री व्यवहार केला त्यामुळे बँकेचे बोजा कमी करण्याचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
सतीश मासाळ (तहसीलदार हिंगणघाट ) :- उमा राजू मंडलवार यांचे संपूर्ण शेत जमीन वर बँकेचे कर्ज असल्यामुळे बँके चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .