सात महिन्यांपासून हजारो रेशनकार्ड प्रलंबित ; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा …

0
208

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड:- शासन आपल्या दारी या ऊपक्रमांतर्गत गत सात महिन्यांपासून रेशनकार्ड संबंधित प्रकरणे तहसिल कार्यालयात पडून आहेत. तालुक्यातील गावागावांतून प्रती लाभार्थी 50 रुपये गोळा करुन शासनाला तब्बल लाखो रुपयाचा महसुल मिळाला आहे. परंतु , सदरील रेशनकार्डाचे प्रकरणे तहसिल कार्यालयात कचर्यासारख्या अवस्थेत असून लाभार्थ्यांच्या याद्यांबाबत पुरवठा विभागच अनभिज्ञ आहे. सदरील हजारो रेशनकार्ड वाटप न झाल्यास शिवसेनेने आंदोलनाचा ईशारा दिलेला आहे. आमदार चंद्रकांत पाटिल यांनी दिनांक 21 रोजी रेशनकार्ड वाटपासंदर्भात सुचना तहसीलदारांना पत्राद्वारे दिलेल्या आहेत.

महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या ऊपक्रमांतर्गत तत्कालीन तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी ऊपक्रम राबविला होता. नविन रेशनकार्ड काढणे , रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट व कमी करणे , विभक्त रेशनकार्ड तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभासाठीचे प्रकरण दाखल केल्यानंतर सशस्त्र सेना ध्वज दिन निधीच्या नावाखाली प्रत्येकी 50 रुपये अशी रक्कम गोळा करुन पावती देण्यात आली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार टोंपे निलंबित झाल्यानंतर तत्कालीन पुरवठा अधिकारी तिर्थकर यांनी रेशनकार्ड वाटप केलेले नाही. तब्बल सात महिन्यांपासून नागरिकांचे हजारो रेशनकार्ड तहसिल कार्यालयात पडून आहेत. शासन आपल्या दारी या ऊपक्रमाला उदंड प्रतिसाद होता. परिणामी ; प्रत्येक गावातून 50 पेक्षा अधिक प्रकरणे दाखल असून त्याची शासकीय रक्कमेच्या स्वरुपात पन्नास रुपयांच्या पावत्या शासनाला अदा केल्या आहेत. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसुल मिळाल्यानंतरही गत सात महिन्यांपासून लाभार्थी वंचित आहेत. 100% रेशनकार्ड वितरित करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांना , कुटुंबातील विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार भोर यांना निवेदन देत आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटिल , नगरसेवक सईद बागवान , नगरसेवक सुनिल बोरसे , नगरसेवक निलेश माळी , नगरसेवक हर्षल बडगुजर, माजी नगरसेवक देवा खेवलकर , अल्पसंख्यांक उप जिल्हा संझटक कलिम शेख , शांताराम कोळी , गोपाळ पाटिल , मनोज पाटिल , अमोल व्यवहारे , तौफिफ पिंजारी ,  मुकेश महाजन , गजानन पाटिल , नवल वंजारी आदि जण ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here