हिंगणघाट। मलक मो नईम
स्कूल ऑफ स्कॉलर्सने 14 सप्टेंबरचा दिवस हिंदी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला. संपूर्ण भारतात हिंदी भाषेचे महत्त्व म्हणून हिंदी दिवस साजरा करण्यासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सने पुढे पाऊल टाकले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रमुख अतिथि भारतीय युवा संस्कार परीषदेचे प्रदीपकुमार नागपुरकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी साहित्य शिरोमणी पुरस्कार यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता सातवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गाण्यांद्वारे मधुर वातावरण निर्माण केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व राज्यांमध्ये हिंदीचे महत्त्व सांगणारे, भारतातील संस्कृती आणि संस्कारांचे सादरीकरण करणारे नाटक सादर केले. पाहुण्या उषा साजापूरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भाषेचे महत्त्व मांडले, त्यासोबतच ऑनलाइन शिक्षणाचे स्त्रोत बनलेली हिंदी भाषा इंग्रजीपेक्षा कमी महत्त्वाची नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी झाशी की राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आरोही हेमके, सरोजिनी नायडूच्या भूमिकेत नेहा उदासी, मुन्शी प्रेमचंदच्या भूमिकेत कनिका लोधी, हरिवंशराय बच्चनच्या भूमिकेत अनुज नौकरकर, मीराबाईच्या भूमिकेत आकांक्षा चाफले, डॉ बाबासाहेबांच्या भुमिकेत गुरुराज डोंगरे यांनी आपल्या कला सादर केल्या. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेवर आधारित नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्याला मेडल व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा चव्हाण यांनी या दिवसाचे महत्त्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता सहावीच्या स्वरा थूल यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
Hindi divas