प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील मौजे साळेगाव,नेर,मोहाडी,पाहेगाव,मोतीगव्हाण,सावंगी तलाव,दहिफळ,मानेगाव,पारेगाव, मौजपुरी,बाजीउंब्रद,वखारी,राठोड नगर(शिवनी),शेवली,पाथरूड, उखळी,शिवनगर,काकडा,शंभू सावरगाव सह आदी गावांमध्ये मागील सात ते आठ दिवसापासून सतत रिमझिम व मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुग,उडीद,सोयाबीन,कापूस,मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात Nuksan bharpae झालेली आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.तसेच मागील काही दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून सदरील झालेल्या नुकसानी बाबत शासन-प्रशासना मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी
याबाबत राष्ट्रीय बंजारा परिषद जालनाच्या वतीने मागणी करीत आहे.सदर या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शाम राठोड,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तुकाराम राठोड,पंकज राठोड,संजय रंधवे,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,नितीन पवार,शिवाजी राठोड,श्याम पवार,गजानन चव्हाण,मधुकर मस्के,विष्णू राठोड,सचिन चव्हाण,कृष्णा राठोड,माकोडे मामा सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहे.
Nuksan bharpae