बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर
बोदवड तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायत येथील चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत वेळोवेळी गैरव्यवहार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या फरारी संशयित माजी प्रभारी सरपंच निलेश माळी यास अटक करण्यात आले आहे शेलवड मुक्तळ विचवा सुरवाडे बुद्रुक ग्रामपंचायतीत 30 डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी 2021 दरम्यान लाखोच्या गैरव्यवहार झाल्याची बाब उघड झाली होती या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) रमेश भास्कर सपकाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि शेलवड चे तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या 52 लाख 94 हजार 180 रुपयाच्या गैरव्यवहाराचा ठपका दोघा संशयितावर होता त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जळगाव कडे वर्ग करण्यात आला होता संशयित ग्रामसेवक निकम यांनी उच्च न्यायालयातून अंतरीम जामीन मिळण्याचे समजते तर संशयित निलेश माळी यांनी सुद्धा अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केल्याचे समजते दरम्यान फरार असलेले संशयित निलेश माळी हे रात्रीच्या वेळी घरी येत असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून 12 तारखेस माळी यास अटक केली निलेश माळी यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे