विरोधी पक्ष नेता माननीय अजितदादा पवार यांचे अमरावतीत जंगी स्वागत

 

उषा पानसरे असदपूर मू.का. संपाकद मो. 9921400542

आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची अजितदादांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

विकास पूर्तीचा वादा- अजितदादा अशा घोषणेने रहाटगाव रिंग रोड टी पॉईंट दणाणला

अमरावती २० ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार शनिवारी २० ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हातील धारणी दौऱ्यावर आले आहेत. राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असल्याने त्यांच्या स्वागतासाठी अमरावती जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली . शनिवारी सकाळी त्यांचे अमरावती रहाटगाव टी पॉईंट येथे आगमन होताच अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी सुद्धा विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार यांचे अमरावती आगमना निमित्य हार्दिक स्वागत केले. रहाटगाव रिंग रोड येथे विरोधीपक्षनेते अजित दादा पवार यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली . तसेच विरोधी पक्षनेता माननीय अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी अमरावतीत विविध भागात पोस्टर्स व बॅनर्स व राष्ट्रवादीचे झेंडे सुद्धा लावण्यात आले. दरम्यान विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार यांनी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला . विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांच्या अमरावती आगमनानिमित्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून एकच दादा-अजितदादा, विकास पूर्तीचा वादा- अजितदादा अशा गगनभेदी घोषणा देतात रहाटगाव रिंग रोड दणाणून गेला होता. तसेच राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार हे धारणी तालुक्यातील आपल्या नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष-विजयराव भैसे, माजी महापौर-रीना नंदा, माजी नगरसेवक-जयश्री मोरे ,ममता आवारे,अलका कोकाटे, रतन डेंडुळे, लकी नंदा, भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक-अजय पाटील मेहकरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत,यश खोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष-आकाश हिवसे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी-के. एम. अहमद, आनंद मिश्रा, जितेंद्रसिंह ठाकूर, ऍड. सुनील बोळे, डॉ. एजाज खान, पप्पूसेठ खत्री, संदीप आवारे, नितीन भेटाळू, मनोज केवले, राजेश कोरडे, सतीश रोंघे, प्रवीण भोरे,मनिष बजाज, विनोद गासे, प्रमोद महल्ले, योगेश सवई, राजेश्वर लेंधे, मोहन खोडे, राजाभाऊ मोरे, प्रवीण पारडे, दीपक यादव, रोशन कडू, शिवपाल ठाकूर, चेतन वाथोडकर, सोमेश्वर मोरे, डॉ. सुधाकर कालमेघ, सुनील रायटे, अमोल देशमुख, जुमम्मा हसन नंदावले, टी. आर. राठोड महाराज, राजेंद्रसिंह कश्यप, राजीक पटेल, प्रा.डॉ. अजय बॉंडे, प्रदीप घोंगडे, आशीष कपले,बंडू निंभोरकर, किशोर भुयार, महेंद्र भुतडा, अजय दातेराव, अभिषेक हजारे, विनोद देशमुख, नाना पानसरे, भोजराज काळे, ऍड.अमित जामथिकर, प्रवीण ईचे, दिनेश देशमुख, भैया पडोळे, विशाल भगत, राजेश बर्वे, संजय मलणकर,दत्तात्रय बागल, विजय मानकर, प्रमोद सांगोले, सचिन दळवी, मनिष पाटील, सागर इंगळे, प्रथमेश बोके, सारंग देशमुख, आदिल शेख, अर्पण सोनी, अनिल कदम, दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, शिवम कुंभलकर, कपिल यादगिरे, महेंद्र किल्लेकर, पुरुषोत्तम गावंडे, शुभम पारोदे, संजय कुकरेजा, वासुदेव बागलकर, संजय तायवाडे, प्रशांत पेठे, अनंत पारिसे, सतीश चरपे, संजय यादव, चंदू चांदोरे, अतुल गवई, नितीन खंडारकर, राहुल पांचाळे, अनिल शिरभाते, रमेशराव मातकर, अमोल वानखडे, संकेत बोके, अभिषेक बोळे, अक्षय पळसकर, अभिषेक धुरजड, संदीप औसिकर, प्रताप देशमुख, किशोर भुयार, श्रीकांत झंवर, किशोर देशमुख, सचिन रहाटे, दिलीप कडू, अजय उर्फ राणा देशमुख, राहुल इंगळे, रत्नदीप बागडे,समीर कडवे, मुकीनदा उकिनकर, महेंद्र सोमवंशी, साहेबराव महल्ले, सुयोग तायडे, शैलेश अमृते, राजेश टाके, आकाश वडणेरकर, सचिन अवजेकर, पंकज गोबरे, सौरभ देशमुख, रणजित कालबांडे, प्रवीण कदम, दिनेश मेश्राम, कर्नलसिंग राहल, राहुल पाटील, निलेश साबळे, पवन आसोपा, छोटू खंडारे, अशोकराव कवितकर,सतीश राऊत, हरिभाऊ डोंगरे ,बादल काळे, गौरव काशीकर, राजेंद्र खडसे, प्रजवल कचरे, सतीश गुलहाने, सनाउल्ला खान ठेकेदार, सादिक भाई कुरेशी, हबीब खान ठेकेदार, शकुर बेग ,सैयद साबीर, बबलू अमापायर, अबरार मोहम्मद साबीर, बाबाभाई ठेकेदार, शेख रेहान, अफसर बेग, नूरखा साब ,कदिर कुरेशी, अब्दुल सत्तार राराणी, युनूस खान , सादिक भाई आयडिया, डॉ. आबीद, यासीन राराणी, सैयद साबीर, जाहिरोद्दीन, सैयद जमादीश भाई, शफीउद्दीन, अक्रम अली ,फारुखभाई मंडपवाले, दिलबर शाह, अहमद भाई, नदीम मुल्ला सर, मोईन खान आदीसह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

Leave a Comment