चिखली येथे सहा दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर संपन्न चिखली येथे गुरुपौर्णिमा स्पेशल आनंद अनुभूती शिबीराचा समारोप

 

सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्रोत-प्रशांत पाटील

चिखली – दि.१२ ते १७ जुलै दरम्यान स्थानिक श्री शिवाजी विद्यालय येथील हॉल मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने सहा दिवसीय गुरुपौर्णिमा स्पेशल आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे ,
या सहा दिवशीय शिबिरात योग, प्राणायाम, ध्यान व अमूल्यध्यानाद्वारे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे,शांत व तणावमुक्त मन,सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी निर्णय क्षमता,मानसिक स्वास्थ्य हे जिवन जगण्याची कला सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून शिकवल्या जात असून सुदर्शन क्रिया हे आरोग्य, आनंद,शांती आणि जिवनाच्या पलीकडे असलेल्या ध्नयानांचे अदभुत,अध्यात रहस्य असून आपण जन्माला येताच सर्वप्रथम श्वास घेत असतो व याच श्वासोच्छ्वासात जिवनाचे खरे रहस्य दडलेले असून श्री श्री रविशंकर यांनी सुदर्शन क्रियेद्वारे अगदी सहज लयबद्धपणे शरीर,मन,भावना यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी विशिष्ट नैसर्गिक रित्या श्वासोच्छ्वासात लयाचा वापर करत शांत आणि एकाग्र मनाने सखोल विश्रांती, तणाव,थकवा, राग,निराशा, नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊन उर्जायुक्त शरीराद्वारे आनंदी जिवन प्रवास कसा करायचा हे सांगितले
सदर शिबिरात भूतकाळ,भविष्य काळात न जगता आहे त्या परिस्थितीत वर्तमानात आनंदी जगण्याची शिकवण दिली ,आपण भूतकाळात जगत असतांना आपल्याला आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप होत असतो तर भविष्याचा विचार केला तर चिंता आपल्याला सतावत असते त्यामुळे आपण दुःखी होत असतो म्हणून भूतकाळ व भविष्यात जगल्यास आपण दुःखीच होणार त्यामुळे वर्तमानात आनंदी जीवन जगण्याची शिकवण देऊन विरोधाभासी मूल्य एकमेकास कसे पूरक असते याचे स्पष्टीकरण देत असतांना आयुष्यात दुःख असेल तरच सुख येणार रात्र असेल तरच दिवस उजडणार असे उदाहरण देऊन विरोधाभासी मूल्य एकमेकास कसे पूरक असतात हे समजावून सांगितले,दुसऱ्याच्या चुकांमध्ये कारण शोधत बसू नका जो व्यक्ती जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा प्रत्येक जण तुमच्या सारखाच किंवा तुम्हाला अपेक्षित मुळीच नसणार म्हणून तो जसा असेल तसाच स्विकार करा असे सांगितले, दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करत बसू नका व वेळ वाया घालवू नका,मोठ्या मनाने माफ करायला शिका व मला गुरुदक्षिणा जी दयाल त्यात कुणाबद्दल जी घृणा, तिरस्कार असेल ती मला दया,त्याच बरोबर तुम्हाला कुठली चिंता सतावत असेल तर ती मला गुरुदक्षिणा म्हणून दया, दुसऱ्याच्या आयुष्यात सुख,समाधान निर्माण करा,सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे श्री श्री रविशंकरजी यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून सांगितले या शिबिरासाठी भगवानराव सावळे सर,सुनील भोजवणी,भास्कर राठोड,गीता भोजवणी,खुशी भोजवणी, उदय शेटे हे शिक्षक म्हणून लाभलेले होते तर या शिबिरास राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी तणावमुक्त,सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग एक प्रभावी ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे, याप्रसंगी डॉ.बी.आर.पाटील,प्रशांत राठोड,,नलिनी पाटील,अश्विनी प्रशांत पाटील,रुद्र पाटील,सुरेखा काकडे, विनायक राठोड,राजेश यंगड,सचिन आरमाळ,प्रतिभा पिटकर,सोनाली चेके आदींनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment