राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या राष्ट्रीय बैठा मधील पदाधिकारीची नियुक्ति। 1,संयोजकपदी बसवराज पाटील

 

2,गदाधर विद्रोही नवे संघटनमंत्री
3,हिंगणघाटचे प्रदीप नागपूरकर राष्ट्रीय सचिवपदी

हिंगणघाट : नईम मलक

गोविंदाचार्य यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीत गोविंदाचार्य यांनी ही घोषणा केली.
बंगलोर येथे पार पडलेल्या दोन दिवसीय चिंतन बैठकीत गोविंदाचार्य यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध सत्रांमध्ये राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे कार्य, घटना, आगामी कामाची दिशा, कामाचे‌ मुद्दे अशा विविध विषयांवर विस्तॄत चर्चा झाली. भारत व गरीबांसाठी अनुकूल अशा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले व्यवस्था परिवर्तन तसेच निसर्ग केंद्रीत विकासासंदर्भात या चिंतन बैठकीत विविध ठरावही पारीत करण्यात आले.
बसवराज पाटील हे यापूर्वी राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संघटनमंत्री राहिले आहेत. त्यांच्या जागी आता गदाधर विद्रोही राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. गिरीराज गुप्त, माधवन हे सह संघटनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. विनयचंद्र व महेन्द्र गर्ग यांची राष्ट्रीय सहसंयोजक असतील. हिंगणघाट येथील प्रदीप नागपूरकर यांची नवीन कार्यकारिणीत राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. गोवा येथील शैलेंद्र वेलणकर, अजय कुमार, चंद्रशेखर मिश्र हे अन्य सचिव असतील. राजाराम यादव, अरुण सत्यमूर्ती, नवरतन राजोरिया, विमलकुमार सिंह, आशीष गुप्ता, रवींद्र शर्मा हे नव्या कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी असतील.
विदर्भातून मुन्ना महाजन, भारती दोनावडे, हसीना राजू गोरडे, प्रा. राजू गोरडे, शरद शहारे आदी या बैठकीत सहभागी झालेत.

Leave a Comment