श्री.संत रुपलाल महाराज पालखीचे वरवट बकाल नगरीत स्वागत

 

सालाबाद प्रमाणे श्री संत रुपलाल महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वरवट बकाल येथे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री.क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथून संत रुपलाल महाराजांच्या पायदळ दिंडी सोहळा अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे. दिनांक 16 जुन रोजी महाराजांची पालखी वरवट बकाल नगरीत दाखल झाली असता सांप्रदायिक भजन मंडळाद्वारे गावातून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी भक्तिमय वातावरणात पालखीचे पूजन करण्यात आले. श्री.संत रुपलाल महाराज मंदिर तसेच गजानन ढगे माजी सभापती ,लक्ष्मण डाबरे,समाधान डाबरे,प्रशांत दामधर,डॉ.अमोल धूड़ेॅ यांच्याकडून मिष्ठांणासह अल्प अहाराची मेजवाणीची व्यवस्था करण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या निमित्याने वरवट बकाल नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण गावातून प्रदक्षणा झाल्यानंतर दिंडीने वानखेड पातुर्डा शेगाव मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले.
यावेळी संत रुपलाल महाराज समिती वरवट बकाल चे अध्यक्ष पांडूरंग ढगे सचिव गोपाल रौंदळे वरवट बकाल च्या सरपंच सौ.प्रतिभा इंगळे उपसरपंच सौ.नंदा रौंदळे सदस्य सौ.मीना इगोकार,,अजय बकाल ग्राप सदस्य नगरीतील कैलास हागे,पांडुरंग टाकळकर, ,काशीराम रौंदळे,श्याम डाबरे,नंदकिशोर रेखाते, पुरुषोत्तम हागे,प्रल्हाद अस्वार गावातील असंख्य भाविक यांनी पालखी सोळ्यात सहभाग घेतला उपस्थित होते.

 

Leave a Comment