किनगाव येथे एका तरूणाने केलेल्या चाकु हल्यात तिन तरूण गंभीर जख्मी .त्या हल्लेखोर तरुणाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाचा तिन जणांवर चाकुहल्ला तिघ गंभीर जख्मी झाले असुन , जख्मींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात या तिघ गंभीररित्या जख्मी झालेल्यांवर उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरा पर्यंत त्या चाकुहल्ला करणाऱ्या विरूद्ध पोलीसांकडुन गुन्हा दाखल करण्यात आलाय . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की किनगाव तालुका यावल येथे दिनांक १५ जुनच्या रात्री १oते १० ,३oवाजेच्या सुमारास गावातील फॉरेस्ट जवळ उभे असतांना) गावात राहणाऱ्या शाह नामक तरूणाने तौसीफ समिर तडवी वय१९ वर्ष , शरीफ लुकमान तडवी वय१९ वर्ष आणी सद्दाम नवाज तडवी वय२० वर्ष यांच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जख्मी केल्याची घटना घडली असुन , तिघ जख्मींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले असुन , जख्मींवर वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम उपचार केले असुन , यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे . या संदर्भात यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे , पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी या घटनेतील जखमींची माहीती घेतली असुन, त्या हल्ला करणाऱ्या तरूणा विरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान हल्ला करणारा तरूण मात्र फरार असल्याचे वृत्त आहे . हल्ला तरूणाने या तिघ तरूणांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला का केला याची मात्र माहीती अद्याप समोर आली नसल्याचे कळते मात्र गावात या उलटसुलट चर्चा होत असल्याचे कळते .

Leave a Comment