यावल शहरात सोशल मीडिया वरील समाज भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल चे पडसाद शहरात काही काळ तणावाचे वातावरण

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे .

यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. , यामुळे मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती . घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे हे देखील शहरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचा शहरातील विविध भागात बंदोबस्त , तैनात करण्यात आला . काल पासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बाबत वाद सुरू असल्याने याबाबतची एकाकडून एका गटाकडून तक्रारही करण्यात आली होती मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस,, अधीक्षक IPS,अशित कांबळे यांनी केले आहे.

Leave a Comment