अमरावती विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून रस्ता निर्मिती

 

उषा पानसरे .कार्यकारी संपादीका मो.9921400542

आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाची जोड

प्रायोगिक तत्वावर पठाण चौक ते भातकुली मार्गावर रस्ता निर्मितीला सुरुवात

अमरावती ३० डिसेंबर: विकासाच्या संकल्पनेत सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे निर्माण करणे महत्वपूर्ण असून यातूनच सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाला चालना मिळते. त्यामुळे शहरातील अनेक लहान-मोठे रस्ते एकमेकांना जोडून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे काँक्रीट जाळे पसरविण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतल्याने शहरातील मुख्य रस्ते त्याचबरोबर शहरातून जाणारे जिल्हा प्रमुख मार्ग, राज्यमार्ग, महामार्ग तसेच लोकवसाहतीमधील अंतर्गत रस्ते आदी मार्गांचा कायापालट झाला आहे . याच शृंखलेत महानगरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता व पुढे भातकुली तालुक्याला जोडणाऱ्या पठाण चौक ते भातकुली रस्ता प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून कात टाकणार आहे. बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी आ. सौ सुलभाताई खोडके यांनी पाहणी केली असता या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. .
अमरावती – भातकुली रस्ता राज्यमार्ग २८० हा मार्ग शहरातील पठाण चौक मधून गेलेला आहे. या मार्गावर अमरावती महानगर क्षेत्रातील लोकवसाहती , वाणिज्य क्षेत्र असून भातकुली रस्त्यावरील अनेक गावांमधील शेतकरी , दूध विक्रेते , कामगार , कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना अमरावती शहरामध्ये येण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करावा लागतो . मात्र या अतिवर्दळीच्या व बहूपर्यायी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथून अवागमन करतांना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जड व अवजड वाहतूक करतांनाही मोठी कोंडी उद्भवत असल्याने या मार्गावर सुरक्षित वाहतुकीला घेऊन अनेक समस्या उद्भवत आहे. दरम्यान या रस्त्याचे निर्मिती कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असता काँक्रिटीकरणाच्या
कामाला २८ दिवसांचा क्युरिंग पिरेड लागणार होता.. या मार्गावर संभाव्य धोका व वाहतुकीची समस्या टाळता यावी व नागरिकांना सुरक्षित अवागमन करता यावे , यासाठी आ . सौ. सुलभाताई खोडके यांनी जातीने लक्ष घालून या मार्गाच्या कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सदर काम हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असता आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामास्थळी प्रत्यक्ष भेट व पाहणी करून सदर रस्त्याचे काम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना केल्यात . विशेष म्हणजे आ .सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाहीची जोड मिळत असल्याने शहराचा कायापालट होत आहे. अमरावती प्रादेशिक विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीचा प्रयोग करून अल्पावधीतच हा रस्ता पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित अवागमनाची सुविधा मिळणार आहे. याच दरम्यान भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम तत्काळ करणे बाबतच्या सूचना सुद्धा मजीप्राचे सहाय्यक उपअभियंता शिवहरी कुलट यांना देण्यात आल्या . यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष – संजय खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे – कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता – तुषार काळे, शाखा अभियंता – सुनिल जाधव, महानगरपालीकेचे उपविभागीय अभियंता – प्रदिप वानखडे, भुयारी गटार योजनेचे – शिवहरी कुलट, वेलस्पन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी जफरूद्दीन सय्यद , कुमार बिल्डर – डॉ . अमीन सय्यद , सनाउल्ला खान ठेकेदार, यश खोडके, हाजी रफीक, ऍड. शोएब खान, आहद अली, सनाउल्ला सर, गाजी जहरोष, हबीब खान ठेकेदार, अफसर बेग, अफझल चाैधरी, सादीक रजा, हाजी इरफान सेठ, कन्नुभाई ठेकेदार, दिलबर शाह, राजु पहेलवान, अफसर भाई, सत्तार राराणी, सैय्यद साबिर, समिउल्ला खाॅ पठाण, फहीम मॅकेनिक, फारुक मंडप, मोईन खान, अबरार साबिर, आरीफ मेमन, सैय्यद वसिम, हमीद खान, जाहीद खान, फिरोज अहमद, शेख सलिम, शेख शकील, शफीक शाह, युनुस भाई, जहीर भाई, नाजीम सर, ईलीयास खान, नसिम पठाण, फिरोज अहमद, जाहीद खान आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ता उपस्थित होते .

Leave a Comment