विकी वानखेड़े जळगाव जिल्हा प्रतिनिधि
Surya marathi news
जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजना (Pradhan Mantri Pikavima Yojana) अंतर्गत २०२१- २२ खरीप हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी (Crop) योजना व राबविण्यात आली होती.व याअंतर्गत विमा कंपनीकडून २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर (Fund) झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. आहे व
या योजनेंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा तालुक्यांतील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी बाजरी-कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झाले आहेत.
Also Read: चोवीस लाखांचे वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीमुक्त
ही नुकसानभरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यांतील २० मंडळांमध्ये मूग पिकांसाठी ४४ लाख, तर उडीद पिकाकरिता सहा लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील आठ मंडळांमध्ये बाजरी पिकासाठी व तीन लाख, तर कापूस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झाली आहे. व ही रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करणार आहे .
Surya marathi news