आ. श्वेता महाले यांचेविरुद्ध कार्यकर्ता सह गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

 

SURYA MARATHI NEWS

बुलढाणा :-  करोनाचे नियमांचे पालन न केल्याप्रकरणी बुलढाण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्‍वेता महाले यांच्यासह कार्यकर्ते सह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून २५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आसूड मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामिल असून येथील नागरिकांना सहभाग नोंदविला होता.
पंढरी मिसाळ यांनी या प्रकरणी चिखली पोलिसात तक्रार दाखल केली होती. की त्यानुसार चिखली पोलिसांनी महाले सह कार्यकर्ते वर गुन्हा दाखल करून घेतला आहे. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. तरी मात्र या नियमांची पायमंल्ली लोकप्रतीनीकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे.
चिखली आमदार महाले यांच्यासह भाजपचे चिखली तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडित देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, बुलडाणा भाजपा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, सुधा काळे, शमशाद पटेल, द्वारकाबाई भोसले, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शिनगारे, शेख अनिस यांच्यासह इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सर्वाणि नियमाच पालन करून सहकार्य करावे

Surya marathi news

Leave a Comment