नियोजन शुन्य आमदार आणि खासदाराची बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत व जनतेच्या इतरही कामाबाबत अनास्था

 

विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांचा आरोप
भविष्यात नागपूर ते वर्धा पर्यंत मेट्रो सुरू केल्या जाईल अशी घोषणा केंद्रीय परिवहन व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी देवळी येथे नगर परिषद द्वारा प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण समारंभात केली.
नागपूर ते वर्धा मेट्रो जर सुरू झाली तर वर्धा शहर आणि परीसरातील जनतेला याचा फायदाच होणार आहे.पण हा फायदा केवळ वर्धा शहाराच्या परीसरातील जनतेलाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त परीसरातील गावांना , लोकांना कसा होईल याचा विचार होणे गरजेचे आहे.या समारंभाला वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती.गडकरी साहेबांनी वर्धा ते नागपूर अशी मेट्रो चालवीली जाईल अशी घोषणा केल्यानंतर खासदार महोदयांनी गडकरी साहेबांशी चर्चा करून वर्धा ते नागपूर अशी मेट्रो सुरू करण्यासोबतच ती हिँगणघाट मार्गे चंद्रपूर-बल्लारपूर- नागपूर अशी करावी अशी विनंती करणे गरजेचे होते.पण मतदार संघाच्या विकासाचे कसलेही नियोजन खासदार महोदयांकडे नसल्यामुळे ते तसे करू शकले नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे.नागपूर -वर्धा -वर्धे वरून हिंगणघाट- चंद्रपूर -बल्लारशहा व बल्लारशहा वरून परत नागपूर अशी मेट्रोची जाणे आणि येण्याची एक फेरी जरी चालविली तरी या परीसरातील जनतेला या मेट्रोचा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो.त्यानिमित्ताने या परिसरात नवीन औद्योगिक प्रकल्प येण्याची शक्यता निर्माण होऊन त्यातून तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो.पण अशी विकासाची दृष्टीच मुळात खासदार महोदयाँकडे नसल्यामुळे ते तशी मांडणी करू शकले नाही.
विशेष म्हणजे देशाचे महत्वाचे मंत्री आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणारे आपले हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते. राजकीय चमकेगीरी शिवाय आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कोणताही विचार त्यांच्या डोक्यात नाही.तो असता तर आवर्जून ते गेले असते आणि गडकरी साहेबांना सांगितले असते की प्रस्तावीत मेट्रोचा फायदा माझ्या हिँगणघाट तालुक्यातील जनतेलाही झाला पाहिजे.त्यासाठी इथे रेल्वे ट्रॕक आहे.तीन लाईन आहे. त्यामुळे इथपर्यंत मेट्रो सुरू करायला काहीही हरकत नाही.असे केल्याने या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो .पण असे विचारच डोक्यात न येणारी ही मंडळी आहे.
याच आमदार महोदयाच्या विधान सभा क्षेत्रात आणि खासदार महोदयाच्या लोकसभा क्षेत्रात दहेगाव नावाचे गाव आहे.त्याला तुळजापूर रेल्वे स्टेशन या नावाने संबोधले जाते.हे गाव रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेल्याने ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना दररोज रेल्वे लाईन ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.त्यासाठी इथे पादचारी पूल निर्माण व्हावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार -खासदार महोदयांकडे मागणी केली .आंदोलने उभारली. रेल्वे मंत्री यांना चारदा भेटून निवेदने दिली-रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदार निधीतून १० लाख रूपये जिल्हा प्रशासनामार्फत रेल्वे कडे जमा करण्यास सांगितले होते .पण १० लाख रूपये खासदार निधीतून हे खासदार महोदय रेल्वेला देऊ शकले नाही .यावरून त्या परिसरातील गावकऱ्यांच्या प्रती मा.खासदार महोदयांना किती आस्था आहे हे दर्शवीते.आमदारही त्याच पक्षाचे]खासदारही त्याच पक्षाचे ]केंद्रात सरकारही त्यांच्याच पक्षाचे असतांनांही गावकऱ्यांच्या या जीवघेण्या प्रश्नाची ते सोडवणूक करू शकत नाही इतकी अनास्था जनतेप्रती यांच्या मनात आहे.यांना जनतेच्या प्रश्नांशी,समस्येशी काहीही देणे घेणे नाही.त्यांना फक्त लोकांना मुर्ख बनवून स्वतःचे राजकारण चमकवीणे यातच जास्त रस आहे.
प्रस्तावीत मेट्रोचा मार्ग कसा राहिल हे सर्वेसर्वा असलेले गडकरी साहेब ठरवतीलच .पण लोकप्रतीनिधी या नात्याने या मेट्रोचा लाभ संबंध वर्धा जिल्ह्यातील जनतेला कसा होईल याचा विचार आमदार -खासदार महोदयांनी त्यांच्याकडे मांडणे गरजेचे होते.पण ही संधी नियोजनशून्य असलेल्या खासदार महोदयांनी rlsp आपल्या हिंगणघाटच्या स्वनाम धन्य कार्यसम्राट आमदार महोदयांनी सभेला गैरहजर राहून गमkवीली हे वर्धा लोकसभा क्षेत्रातील जनतेच दुर्दैव्यच म्हणावे लागेल.
हिंगणघाट येथील गडकरींच्या एका कार्यक्रमात आमदार महोदयांनी वणा नदीच्या खोलीकरणाचा आणि सौंदर्यीकरणाचा विषय मांडला होता .तेव्हा गडकरी साहेबांनी खंत व्यक्त केली की]याला आता खुप उशीर झाला आहे.या अगोदर हे खातेच माझ्याकडे होते.त्यावेळेला हा विषय आमदार समीर कुणावार ;akuh माझ्याकडे आणला असता तर केव्हाच हा प्रश्न निकाली निघाला असता. म्हणजे इथे देणारे तयार आहे पण घेणारे तयार नाही. आणि हे सर्व कशामुळे घडते आहे तर जनतेनी निवडून दिलेल्या या लोकप्रतीनिधींच्या मनात जनतेच्या कामाप्रती असलेल्या अनास्थेमुळे घडते आहे.असे हे नेतृत्व आपल्या वर्धा जिल्ह्याला लाभल्यामुळे जिल्ह्यात ना नवे उद्योग येऊ शकले ना तरूणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकल्या.
आता तरी जनतेने अशा सामाजिक बांधीलकी नसलेल्या ]जनतेच्या कामाप्रती आस्था नसलेल्या नेतृत्वापासून सावध रहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे विदर्भ विकासआघाडीचे अनिल जवादे यांनी जनतेला केले आहे.
सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे वर्धा

Leave a Comment