बारी समजाचे आराध्य दैवत असलेले संत रुपलाल महाराज यांची आज पुण्यतिथी त्यांच्या जीवनचरित्रातील प्रकाशझोत

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाराष्ट्रामधील विदर्भ अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी नगरीचे कर्मयोगी संत रुपलाल महाराज यांच्या वास्तव्याने पावन झा ग्गवलेली ही पुण्यभूमी आहे. अंजनगाव नगरीला धार्मिक जगतामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले कारण येथे भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समाधिस्थ झालेले वैराग्यमूर्ती श्री संत रुपलाल महाराज.
श्री संत रुपलाल महाराजांचा जन्म जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रुपलाल महाराज यांच्या आईचे नाव कासाबाई आणि वडीलांचे नाव शामजी होते संत रुपलाल महाराज पानमळा लावायचे व त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. प्रामाणिक व बालपणापासूनच धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असलेले संत रुपलाल महाराज गाडगेबाबांचे कार्य व महती जाणून होते, त्या काळी संत गाडगेबाबांचे कीर्तन गावोगावी होत असत असे एकदा गाडगेबाबांचे कीर्तन त्या परिसरात झाले,कीर्तनानंतर संत गाडगेबाबा संत रुपलाल महाराजांच्या पानमळ्यात पोहचले बराच काळ संत गाडगे बाबा आणि रुपलाल महाराज यांच्यामध्ये संवाद झाला.भक्ती, ज्ञान ,वैराग्य रुपी उपदेश गाडगे बाबा यांच्याकडून रुपलाल महाराज यांनी घेतला. हाच काळ त्यांच्या जीवनाची दिशा बदलविणारा ठरला.श्री संत रुपलाल महाराज कर्म हेच मर्म याची जाणीव करुन देणारे संत शिरोमणी श्री संत रुपलाल आजही समाजाला आपल्या कामकाजातून परमार्थ साधता येऊ शकतो, आपल्या कार्यावर निष्ठा, जिद्द ठेवली तर अशक्य गोष्टही शक्य होवू शकते याची अनुभूती देणारे संत म्हणजे श्री संत रुपलाल महाराज. आपल्या कर्तव्यापासून न ढळता एकाग्रताने त्यांनी साक्षात भगवंताला आपलेसे केले, संत गाडगे बाबांच्या या भेटीनंतर संत रुपलाल महाराज यांनी प्रपंचाचा आणि घरादाराचा त्याग करुन वैराग्य पत्कारले त्यानंतर पंढरपूरला निघून गेले, तेथून १२वर्ष त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या केली परत आल्यानंतर मडक्याची खंजेरी,टाळ आणि भोपळ्याचा विना वाजवत संत तुकारामाच्या अभंगाचे गायन करण्यात तल्लीन होऊन जायचे. अध्यात्म आणि भक्तीमार्गाची गोडी लागलेले संत रुपलाल महाराज यांचा प्रारंभीच्या बराचसा काळ चारीधाम भ्रमण, ध्यानधारणा व तपश्चर्या करण्यात गेला तपश्चर्येनंतर आपल्या पहूर या गावात सप्ताह साठी पोहोचल्यानंतर दिवसभर ते गावाची स्वच्छता करायचे आणि रात्री कीर्तन करून ते लोकांना उपदेश करायचे भ्रमण करताना ते पुढे महाराष्ट्रातील खान्देश- विदर्भातील अशा अनेक गावांमध्ये त्यांचे वास्तव्य होते.संत रुपलाल महाराज यांनी समाजात सामुहीक विवाह सोहळा सुरु करून त्याची सुरुवात जळगाव जामोद येथून केली.संत रुपलाल महाराज १९७१ साली अंजनगाव व आकोट या परिसरात आले पुढे अंजनगाव सुर्जी येथे पोहोचले. सकाळपासून हाती खराटा घेऊन ते गाव स्वच्छ करायचे व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगायचे ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे.त्यांनी भुकेलेल्यांना जेवण दिले, तहानलेल्यांना पाणी दिले,
गरिबांना वस्त्र दिले, शिक्षण दिले, बेघरांना आसरा दिला,हिम्मत दिली,
एक नवा समाज घडविण्यासाठी त्यांनी लोकांना आत्मबळ दिले.
अंगावर भगवे कपडे आणि हातात एक खराटा असा त्यांचा वेष असे ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत, समाजातील भेदाभेद नाहीसे करण्यासाठी महाराजांनी हयातभर भजन- कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. “मानवता” हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे येथे गावागावात जाऊन ते आपल्या भजनातून म्हणत
कुठे काही काम करावयाचे असले की संत रुपलाल महाराज स्वतःहून पुढे येत सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला त्यांनी लोकसवेचे व्रत सोडले नाही कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे . त्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले यासाठी सप्ताह, भजन कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने उपयोग करत असत.व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची बळी देऊ नका ,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे उपदेश करीत असत आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने उपयोग करत असत संत रुपलाल महाराज म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी वृत्ती,हातात एक झाडू,झाडू नसेल तर काठी.झाडू घेऊन कुठेही कचरा दिसला की तो स्वतः दूर करवायचा हा महाराजांचा नियम. अध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे कर्मयोगी संत रुपलाल महाराज सत्पुरुष!
संत रुपलाल महाराज यांच्या कार्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्यांच्या दर्शनाला व त्यांचा उपदेश ऐकायला असं की लोक यायचे संत रुपलाल महाराज यांनी संकल्प करून अंजनगाव सुर्जी मधील गावकरी मंडळींना घेऊन त्यांनी भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारले येथे गावकरी मंडळी ला घेऊन एका रात्रीमध्ये विहिर बांधण्यात आली या विहिरीला अष्टमासिद्धी चे महात्म्य प्राप्त झाले या विहिरी मधील पाण्याने स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे भक्त मंडळींना इथून पुढे संत रुपलाल महाराजांनी क्षेत्र अंजनगाव सुर्जी ते श्री क्षेत्र पंढरपूर वारी सुरू केली
संत रुपलाल महाराज या थोर कर्मयोगी संत सत्पुरुषांनेश्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथे चैत्र शुद्ध पंचमी शके १९१६ म्हणजेच १६ एप्रिल १९९४ रोजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला, अंजनगाव सुर्जी येथे भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मध्ये असलेले समाधीस्थळ आजही त्यांच्याh श्रेष्ठत्वाची महती जागवीत आहे
श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी नगरीचे आराध्य ग्रामदैवत श्री संत रुपलाल महाराज यांच्या चैत्र शुद्ध पंचमीस असलेल्या पुण्यतीथी सोहळ्याचे औचित्य साधून त्यास लेखरूपाने अशा महान संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन!

Leave a Comment