केंद्र सरकारकडून कोरोना व्हाक्सिंन लसीकरण चा मोठ्या प्रमाणात गाजावाजा तर लसीकरण केंद्रावर तुटवडा

 

सचिन वाघे वर्धा

दि.१० एप्रिल राज्यात कोरोना व्हाॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उद्यापासून दि.११ महात्मा फूलेंच्या तसेच १४ एप्रिल डॉ.आंबेडकर जयंतीपर्यंत लसिकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत.
अलिकडेच लसिचा तुटवड़ा निर्माण झाल्यावर तालुक्यातसुद्धा याची झळ पोचल्याचे दिसुन येत आहे. शहरात तसेच तालुक्यातील सर्वच कोरोना लसिकरण केंद्रावरीलसुध्दा कोरोना लसी संपल्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जात असलेल्या नागरीकांना लसिकरण केंद्रावरुन निराश होऊन परत यावे लागत आहे.
यासंबंधी आरोग्य विभागाशी संपर्क साधून विचारपूस केली असता राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसिचा साठा संपल्याने लसिचा पुरवठा बंद आहे.येत्या एक दोन दिवसात व्हाॅक्सिन उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली असून राज्याला लसिचा साठा उपलब्ध होताच शहरातील कोरोना लसिकरण केंद्रावर तातडीने म्हणजे १-२ तासाचे अवधित लस उपलब्ध करून देण्यात येईल असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आज मात्र मोठ्या आशेने लसिकरण करुन घेऊ इच्छीणाऱ्या लाभार्थ्यांना निराश होऊन परतावे लागले.
मोठा गाजावाज़ा करुन लसिकरण मोहिमेस सुरुवात केल्यानंतर लगेच लस संपल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
राज्यात सर्वत्र कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून तालुक्यातसुद्धा हिच परिस्थिति आहे.

Leave a Comment