रेती घाटावरील अवैध रेती वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदार यांना दिले निवेदन…

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:-

मौजे झाडेगाव, मानेगाव व येरळी येथे रेतीचे (घाट) असुन त्या रेती घाटांची हर्राशी झालेली आहे. सदर हर्राशी नुसार ठेकेदारांनी ठेके घेतलेले असुन सदरची रेती रॉयल्टीवर विक्री करीत असतात. सदरहु ठेकेदार यांनी दररोज एकाच रॉयल्टीवर दिवसभर इतर लोकांना मोठ्या प्रमाणावर रेती विक्री करीत असल्याचे आढळल्याने अर्जदारांनी ठेकेदारांना रॉयल्टी संबंधी माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आमचे वरपर्यंत हात आहेत त्यामुळे तुम्ही आमचे काहीही करु शकत नाही तुमच्या च्याने जे होत असेल ते करुन घ्या अशी धमकी दिली.यावरुन असे दिसुन येते की सदरहु ठेकेदार व त्यांचे कर्मचारी हे कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर रेतीची विक्री करित आहेत. त्यामुळे शासनाची फसवणुक होत असुन नुकसान होत आहे.असे असल्यामुळे व अर्जदारांना खरी व सत्य परिस्थिती माहिती असल्यामुळे सदरहुन अर्जदार हे कायदेशीररित्या तक्रार करीत आहेत. सदर तक्रारीवरुनचौकशी होऊन ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीररित्या कार्यवाई करण्यात यावी सदरह ठेकेदार व कर्मचारी यांचेवर चौकशी न झाल्यास अर्जदार हे उपोषणास बसतील याची नोंद घेण्यात यावी. या निवेदनावर अय्याज अहमद नियाज अहमद ,सैय्यद शमीम सैय्यद कालू यांच्या सह्या आहेत.

Leave a Comment