(उप विभागीय अधिकारी यांना ) निवेदन
सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट: – दोन एप्रिल रोजी शेतकरी आंदोलनातील नेते राकेश तिकैत हे राजस्थानातील अलवर जिल्ह्यात असताना स्वागताचे नाटक करून अभाविप (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी आघाडी ) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी टिकैत यांचेवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर शेतकरी नेत्यांवर प्राणघातक हल्ला करणे हा सर्व कष्टकऱ्यांचा अपमान आहे. व तो आम्ही सहन करणार नाही. असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून राकेश टीकैत यांना सुरक्षा देण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांनी ही भूमिका घेण्याची वेळ येणे हेच सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या आणि शेतकरी कष्टकरी विरोधी नियतीचे पुन्हा एकदा दर्शन देत आहे. देशाचे प्रधानमंत्री म्हणून देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भावा मध्ये देशव्यापी शेतकरी आंदोलन मागील 125 दिवसापासून सुरू आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावू शकत नाही किंवा या समस्येवर तोडगा काढू शकत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल . देशांमध्ये एवढे मोठे शेतकरी आंदोलन सुरू असताना प्रधानमंत्री मात्र निवडणुकीच्या प्रचारसभेत व्यस्त आहे . याचा अर्थ प्रधानमंत्री संपूर्ण भारत देशाचे आहेत की फक्त भारतीय जनता पक्षाचे आहेत असा संभ्रम जनतेत निर्माण होत आहे. त्यामुळेच ते भारतीय शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काय ? जेव्हा जेव्हा विचारांची लढाई आपण करत आहोत असे भाजप किंवा संघ यांना दिसून आले आहे तेव्हा तेव्हा ते हिंसेवर उतरले आहेत सध्या हल्लेखोर 16 अभाविपचे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला भाजप व संघाची लोकशाही विरोधी भूमिका स्पष्ट करीत आहे. विचारांची लढाई विचारांनी न लढता हिंसात्मक मार्गाने आंदोलन दडपून टाकण्याचा भाजपा आणि संघाचा प्रयत्न आहे. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो- धिक्कार असो. या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून शेतकरी नेते राकेश टीकैत यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे अभाविपचे कार्यकर्ते असेल तर त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले. अभाविपची मातृ शाखा आरएसएस आणि बीजेपी यांचा या कटामागे काही हात आहे काय ? याचा तपास करून जे दोषी असेल त्यांच्यावर तत्काळ आरोपपत्र दाखल करावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकावे अशी मागणी राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे . हे निवेदन देत असताना शेतकरी नेते अनिल जवादे महेश माकडे दिनेश वाघ जयंत धोटे अजय मुळे गोपाल मांडवकर व इतर शेतकरी पुत्र उपस्थित होते