सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

– रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा आहे या प्रचितीतीची जाणीव करून देत साखरखेर्डा येथील निष्णात सिध्द धन्वंतरी बालरोग तज्ज्ञ डॉ ज्ञानेश्वर तांगडे यांनी गणेश जयंतीचे औचित्य साधून बालरुग्णालय बंद ठेवून दि 13 फेब्रुवारी रोजी दिवसभर सवडद येथील सिध्दविनायक मंदिरावर एक हजार बालकांची मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार केले आहेत.
करोनाच्या भयातून आताशा कुठेतरी लोक बाहेर येत असले तरी देखील भीती मात्र कायम आहे. दवाखान्यात गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आढळून येतात तर खेडेगावात बालकांच्या किरकोळ आजारावर पालक लक्ष देत नाहीत. त्यामुळे सवडद येथे गणेश जयंतीचे औचित्य साधून मोफत बालरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ ज्ञानेश्वर तांगडे यांनी सर्दी, ताप, खोकला अशा आजारावर उपचार करून आध्यात्मातून माणवसेवेचा वीडा उचलला आहे. दरम्यान सांप्रदायिक कार्यक्रमात भाविकांनी आरोग्य शिबीरे घेऊन आपल्या कुटूंबियाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन डॉ तांगडे यांनी केले आहे.

Leave a Comment