8 दारू अड्ड्यांवर धाड घालून 9.52 लाख

 

गोंदिया-शैलेश राजनकर

दि. 20शहरातील अवैध व्यवसायांवर आळा बसावा या उद्देशाने अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालण्याचे सत्र तिरोडा पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील संत रविदास वॉर्डातील 8 अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालून तब्बल 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज शनिवारी, 19 डिसेंबर रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संत रविदास वॉर्ड येथे काही लोक अवैध दारू बाळगून, दारू गाळण्यासाठी सडवा रसायन भिजत घातलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरुन पोलिसांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिसांचे वेगवेगळे 8 पथक तयार केले व त्यानंतर 8 दारू अड्ड्यांवर धाड घातली. या कारवाईत मोहफुलापासून दारू गाळण्याच्या दोन भट्ट्या व साहित्य असा एकूण 9 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळी नष्ट केला. यात 2 हजार 450 रुपयांचे साहित्य, 10 हजार रुपये किमतीची मोहफुलांची 100 लिटर दारू, 1175 प्लास्टीक पोतींमध्ये प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे 9 लाख 40 हजार रुपये किमतीचा 11 हजार 750 किलो दारू गाळण्याकरिता भिजत घातलेला रसायनयुक्त सडवा मोहफूल यांचा समावेश आहे.
आरोपींमध्ये मिलन कुवरदास , मनिषा धीरज बरियेकर, वनमाला भीमराव झाडे, कविता सेवकराम तांडेकर, माया शामराव झाडे, सूरज प्रकाश बरियेकर, रूपवंता ईश्वर बरियेकर, आशा राजेंद्र भोंडेकर सर्व रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलीस निरीक्षक हनुवते, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, पोलीस हवालदार दामले, साठवणे, पोलीस नायक थेर, सव्वालाखे, बरवैया, बर्वे, श्रीरामे, बांते, मडावी, पोलीस शिपाई बिसेन, अंबादे, भांडारकर, लोंढे, महिला पोलीस नायक मडावी, तिरीले यांनी केली.

Leave a Comment