ना.बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी,दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह गुरूकूंज मोझरी येथुन दिल्ली कडे रवाना…!
अमरावती – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात अनेक राज्य पेटून उठले आहे . तिथे आजही आंदोलन सुरु आहेत . केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब,राजस्थान, हरियाणा सह आदी राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत तिरव आंदोलन सुरू आहे. शेतकरी आक्रमक होत दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे . चलो दिल्लीचा नारा देत गुरूकूंज मोझरी येथुन हजारो दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्ली कडे रवाना झाले आहे ह्यावेळी चक्काजाम आंदोलन सुद्धा केले असता सर्व वाहन ठप्प झाले होते.
या प्रवासात ठिकठिकाणी शेतकरी भेटत आहे त्यांच्यासोबत चर्चा केली समस्या जाणुन घेतल्या. सर्व भारतातील शेतकर्यांची परिस्थीती समान आहे. लागत जास्त व भाव कमी आहे. यासाठीच उत्पादन खर्चाच्या ५०% नफा धरुन भाव देण्यात यावा ही मागणी अत्यावश्यक आहे. या ठिकाणी बच्चू कडू यांनी आवाहन केले आहे की 7 /12 वाचायचा असेल तर 8/12 मध्ये सामील व्हा