संग्रामपुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सर्वच अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

0
627

 

 

आल्याने चिंता वाढली आहे. सोबतच तीन दिवसांपूर्वी या शाखेतील एक अधिकारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामूळे तीन दिवसा पासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करून एकूण दहा लोकांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीला पाठविले होते.दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबमध्ये तान वाढत आहे.परिणामी संग्रामपूर येथील बँकेतील लोकांचे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागले. चवथ्या दिवशी आलेल्या रिपोर्ट नुसार या बँकेतील शाखा व्यवस्थापकासह इतर तीन अधिकारी व अजून एक जण तसेच याच बँकेशी संबधित एक असे सात जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयुर वाडे यांनी माहिती दिली आहे.सदर बँक चार दिवसांपासून बंद असून आता अजून किती दिवस बंद राहणार हे सद्या तरी सांगता येणार नाही. या मुळे या बँकेत व्यवहार करणाऱ्याची चांगलीच पंचाईत झाली असून वरिष्ठांकडून यावर काही पर्याय काढला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here