407 पलटी मध्ये  3 जण  ठार तर, 6 जखमी

 

 

हिम्मतराव तायडे

महाराष्ट्र ब्युरो चीफ

गंभीर जखमींवर अकोल्यात व तेल्हारा रुग्णालयात उपचार सुरू
बाळापूर तालुक्यातील अंधुरा येथुन कापूस घेऊन जाणारा 407 मिनी डोअर पलटी झाल्याने अपघातातील गंभीर जखमींना तेल्हारा व अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अपघातामुळे अकोट – शेंगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
शेगाव – आकोट महामार्गावरील अंदुरा ते आडसूळ दरम्यान कापूस भरून घेऊन जाणारा 407 मिनी डोअर वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन त्यामध्ये 3 जण जागीच ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 दरम्यान घडली.

ग्राम हाता येथून कापूस भरून घेऊन जाणारा 407 मिनी डोअर क्रमांक MH04 GC 9420 क्रमांकाचा मिनी डोअर आकोट कडे जात असताना मिनी डोअर चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने परस्पर विरोधी दिशेने तळेगाव बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम पार पाडून शेगाव कडे जात असलेल्या MH28 AV 3288 क्रमांक असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. व मिनी डोअर बाजूला जाऊन पलटी झाले. यामध्ये दुचाकी वरील प्रल्हाद अडकणे रा. दसरा नगर शेगाव वय अंदाजे 60 वर्षे तर मिनीडोअर मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील 2 व मिनीडोअर मधील 4 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परतू अंदुरा – आडसूळ ग्रामस्थांच्या सहकार्याने ते सुरळीत करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उरळ व तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित येऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच अंदुरा सरपंच संजय वानखडे, आडसूळ सरपंच सदानंद नवलकार, पोलिस पाटील ज्ञानदेव रोहणकर, तलाठी सतीश कराड, तलाठी काकडे, कोतवाल राजु डाबेराव, शुभम नवल कार, शिव हरी बाहे, आदी ग्रामस्थांनी मदत करून मार्गावरील ठप्प असलेली वाहतुक सुरळीत केली.

ओव्हर लोड असलेल्या गाड्यांची बेताल वाहतुक
मागील काही दिवसांपासून अंदुरा परिसरातून ओव्हर लोड असलेल्या गाड्यांची बेताल वाहतुक सुरू असून या बेताल वाहतुकीमुळे आजचा अपघात झाला असावा असे ग्रामस्थांकडून बोलल्या जात असून या बेताल असलेल्या वाहतुकीला आला घालावा अशी मागणी करण्यात

Leave a Comment