गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पक्षांतरांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर माजी आमदार तसेच पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.#Uddhav Thackrey
उध्दव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. तेव्हापासून ते आतापर्यंत शिवसेनेतील आऊटगोईंग सुरूच आहेत.#eknathshinde
Uddhav Thackrey
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. उध्दव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.#cmomaharashtra
सोलापूरमधील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात काय चालय असं म्हणत साईनाथ अभंगराव यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर साईनाथ अभंगराव हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर या भागातील जून्या व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये धुसफूस वाढल्याचे दिसून येत आहे.
यातूनच अभंगराव यांनी शरद कोळीच्या निवडीवर आक्षेप घेत राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता.#Uddhav Thackrey #suryamarathinews