भाजपा जिल्हा महिला आघाडी च्या वतीने आयोजित कार्यक्रम.
स्व.सुषमा स्वराज पुरस्कार मिळाला.
सिंदी रेल्वे ता. १५ येथील उच्चशिक्षित महिला रत्ना वरुडकर हिने नोकरी न करता, एखादा व्यवसाय करावा या उद्देशाने काही महिन्यां आधी दुग्ध संकलन करण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरु केलेल्या छोटा व्यवसायाला शेतकरयांनी सहकार्य करुन भरुन पाठिंबा दिला.
यातच त्यांना हल्दिराम समुहाने आमच्या कंपनीत आपण संकलीत केलेले दुग्ध द्या, आणि दुग्ध संकलन केंद्र परवाणा दिला.सुरु केलेल्या छोट्या व्यवसायाला बळ मिळाले आणि आजघडीला ते पाचशे ते सहाशे लिटर दूध शेतकऱ्यां जवळुन संकलीत करुन हल्दिराम कंपनीत पाठवतात.
त्यांच्या या शेती पुरक दुग्ध व्यवसायाची वर्धा जिल्हा महिला आघाडी ने दखल घेऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देवळी येथील चंद्रकौशल सभागृहात वर्धा जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री स्व.सुषमा पुरस्कार रत्ना वरुडकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार,सरीता गाखरे, शोभा तडस, सिंदी शहर भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पुष्पा सोनटक्के यांची उपस्थिती होती.त्यांच्या या पुरस्कार सन्माना बद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले असुन अनेक स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.