अजहर पठान सेलू/परभणी
श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची उपजिल्हाधिकारी सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, सेलू मध्ये *कोरोणा टेस्ट केल्यावर जे पण रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्या रूग्णांना त्यांच्या इच्छेनुसार होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण हे रुग्ण घरी न बसता पुर्ण गावात कोरोणाचा प्रसाद वाटत फिरत आहेत. या रुग्णांवर कोणाचेच नियंत्रक नाही. म्हणून कोरोणाचे रुग्ण वाढत आहेत*म्हणून जे पण होम क्वारंटाईन रुग्ण आहेत त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात यावा. जेणेकरून हे लोक गावात फिरणार नाहीत. तसेच या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी गाव वाईज व वार्ड वाईज माणसाची नेमणूक करण्यात यावी *जेणेकरून कोरोणाचे नियंत्रण करण्यासाठी शासनाचे जे प्रयत्न चालले आहेत. त्या प्रयत्नांना यश येईल*तसेच कोरोणाचा प्रसार कमी होईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
*यावेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, सिध्देश्वर कदम, सुमित लंगोटे, बाबा शेळके उपस्थित होते.