सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला यांनी 3जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती हा महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला ‘मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली ‘सर्वप्रथम हिवरा आश्रम येथील प्रवेशिका सौ लोंढे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे रीतसर पूजन केले .यानंतर त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मध्ये महिलांनी आपले कर्तव्य पार पाडावे व तत्परतेने कामे करावी असे मार्गदर्शन केले ‘यावेळी अंगणवाडी सेविका संगीता मोरे केंद्र क्रमांक तीन नीता जागृत ‘ मीरा ठाकरे व इतर महिला उपस्थित होत्या ।