यावल तालुका प्रतिनिधी .
विकी वानखेडे
हिंगोणा गावात पाच जलकुंभ असून ते जलकुंभांना चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाल्यामुळे त्या जलकुंभांची मुदत संपली असून जलकुंभ तात्काळ पाडून नवीन बांधकाम करण्यात यावे अशी तक्रार गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीला नेहमी करीत होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने सन १७/१८ या कालावधीमध्ये शासनाला पत्र दिले की मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत गावात नवीन जलकुंभाची उभारणी करावी गावात सन १८/१९या वर्षात १लाख लिटरचे जलकुंभ या योजनेत मंजूर झाले हिंगोणा ग्रामपंचायतीने रितसर जागेचा ठराव पाठवून हे जलकुंभ वि का सोसायटी परिसरात उभारणीचे काम ठरवीले परंतु काही ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यावल यांच्याकडे अर्ज दिले की ठेकेदार हे कामावर पाणी मारत नसून संपूर्ण निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी तीन महिने काम बंद केलेले होते मुख्यमंत्री पेयजल योजना ही ४७.३५लाख अंदाजीत रक्कम असून या योजनेत डोंगर हाड र्चौकातील २. लाख लिटर जलकुंभाची दुरुस्ती करणे गावात वितरण व्यवस्था करणे नवीन एक लाख लिटर जलकुंभाला तार कंपाऊंड करणे असे काम या योजनेत आहे परंतु एकही काम झालेले नाही फक्त पिण्याच्या टाकीचा सांगाडा उभा केलेला दिसत आहे भर उन्हाळ्यात हिवाळात पाण्याची टंचाई असल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो येथे चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेजल योजना मंजूर होऊन आज तीन वर्षे पूर्ण होत आहे तरीदेखील या योजनेचे काम अपूर्णावस्थेत असून भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना या योजनेचा काय फायदा असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत असून ते पूर्ण न करता पाईपलाईनचे काम ज्या भागात पाहिजे त्या भागात केली नाही ती पाईपलाईन दुसऱ्याच भागात केली गेली आहे पण ते सुद्धा मोजकीच केलेली आहे अशा योजनेचा गावाला फायदा काय ही योजना फक्त अधिकार्यांच्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी आहे का असे हिंगोणा परिसरातून व गावातून बोलले जात आहे की ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे होत आहे काम अपूर्णावस्थेत असून सुद्धा पाईपलाईनचे काम करणे व सात टक्के बिल काढणे हे कितपत योग्य आहे तात्पुरत्या स्वरुपाची दुसर्या भागात पाईपलाईन टाकून ते पाण्याच्या टाकीला जोडण्यात आले आहे का याची सुद्धा वरीष्ठ पातळी वरून चौकशी झाली पाहिजे तसेच गुलदस्त्यात आहे तरी काय .आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी या योजनेचे गत हिंगोणा गावात झाली आहे या योजनेअंतर्गत 47 लक्ष एवढा निधी प्राप्त झाला आहे परंतु पाण्याच्या टाकीचे काम हे बद असल्याने या योजनेचा ग्रामस्थांना काही एक फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी यांचे सुद्धा दुर्लक्ष असून याकडे भिजत घोंगडे करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत
प्रतिक्रिया
प्रतिष्ठित शेतकरी मनोज भाऊ वायकोळे हिंगोणा
हिंगोणा गावात सत्तेचाळीस लाख रु मुख्यमंत्री पेयजल योजनेचा निधी येऊन बरेच दिवस होऊनसुद्धा ठेकेदार व अधिकार्यांच्या दुर्लक्षतेमुळे काम बंद अवस्थेत आहे त्यामुळे हिगोणा गावांचा पाणीप्रश्न केव्हा सुटेल यांची खंत वाटत आहे
प्रतिक्रिया
माजी ग्रामपंचायत सदस्य विजय सिंग रुपसिंग पाटील हिंगोणा
महाराष्ट्रात हिंगोणा ग्रामपंचायत ही दोन नंबर ग्रामपंचायत असून या गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेचे तीनतेरा झाल्याचे दिसत आहे
प्रतिक्रिया
देविदास फालक हिंगोणा
महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनातून गावोगावी पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना हे गावात मंजूर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे व ठेकेदारचा हलगर्जीपणामुळे या योजनेचे काम शुन्य प्रतीचे दिसत आहेत अशा कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी