हिंगणघाट शहरात शासन व प्रशासन विरोधात जन आक्रोश मोर्चा

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 14 ऑक्टोंबर
हिंगणबाट बचाव समिती, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना कडून प्रशासन व शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष बाबत , मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली मागणी सध्या शहरात खालील विषयाकडे आज लक्ष देण्याची गरज आहे.
1)किडन्यापिंग चे प्रयत्न पाहता शहरातील बंद असलेले सी. सी .टीव्ही.कॅमेरे त्यरित चालू करण्यात यावे.
२) शहरातील बाल वयातील मुले व्यसनाधीत होत असल्यामुळे गांजा. दारू, नशेच्या गोळया या सारखे अवैध धंधे बंद करण्यात यावे.
३) शहरात दामिनी (चार्ली) पथक स्थापन करून सुसाट बाईक चालविन्यावर कार्यवाही करण्यात यावी.
अधिकारी यांना आठ दिवसात या समस्या निकाली काढा ? अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. श्री. सतीश मासाळ (तहसीलदार) यांनी येत्या मंगळवारी (ता.18 ऑक्टोंबर मंगळवार ला या विषयावर सर्व अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची सभा घेवून हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

Leave a Comment