हिंगणघाट शहरात गाय चोरी करणारे आरोपींना अटक

0
719
Illustration of a Farmer with ox

 

हिंगणघाट :- दि. 02 जुलै रोजी पोस्टे हिंगणघाट येथे फिर्यादिने रिपोर्ट दिली कि, दि. 25/06/2022 रोजी पासुन त्यांची मालकिची एक कोशा रंगाची गाय कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे. हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण प्रथकाने हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अनोळखी आरोपीतांचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) अनिल बाळकृष्ण चटप वय 52 वर्षे 2) रामा संभाजी तराळे वय 47 वर्षे दोन्ही रा. माता मंदीर वार्ड, हिंगणघाट यांना ताब्यात घेवुन त्यांनी सखोल विचारपुस केली असता, त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असुन, सदरची चोरी केलेली गाय हि यवतमाळ येथे रविवार बाजारात शेतकऱ्याला पाळण्या करीता विकली असल्याचे सांगितल्याने यवतमाळ येथुन फिर्यादीची चोरीस गेलेली गाय हि जप्त करून पोस्टे हिंगणघाट येथे सुरक्षीत पोहचवण्यात आली. आरोपीतांना गुन्हयात वापरलेले वाहन सुद्धा जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयात एकुण 3,20,000 रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. पियुश जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे. तरी सदरची बातमी प्रसारीत होणेस विनंती आहे.
सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here