हलबीटोला येथे कार्यानुभवातून धानावरील रोगाचे मार्गदर्शन

 

सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील हलबिटोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सडक-अर्जुनी येथील विद्यार्थी मनोज पांडुरंग दमाहे याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्राम हलबिटोला येथील शेतकऱ्यांना धान पिकावरील विविध रोगांवर मार्गदर्शन केले. यात धानावर मोठ्या प्रमाणात होणारा खोडकिडा, मावा, तुडतुडा व अन्य प्रकारची रोगांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावर कोणत्या प्रकारचे जैविक उपचार तसेच रासायनिक उपचार करता येतात याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही आवर्जून उपस्थित बांधावर उभे राहून माहिती घेतली. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांनाही बराच लाभ मिळतो अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाद्वारे दरवर्षी ग्राम हलबिटोला येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांना विविध रोगांवर माहिती तसेच त्यावर उपचाराबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित केले जावेत अशी मागणी केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. डी. आराम, प्रा. जी.आर. भाजीपाले, प्रा. एन. एन. रामटेके, प्रा. डी. आर. भोसले आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अनारसिंह, सुमित बोरकर आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment