स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन

शेगाव :- प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने दि.5/11/2020 रोजी शेगाव तहसील चोक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून.
शेतकरी विरोधी कृषी विधेयक सरकारने रद्द करावे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना किमान पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
तालुक्यातील आनेवारी वस्तुनिष्ठ 50% च्या आत घोषित करावी.
पिक विमा कंपन्यांना सरसकट 100% पिकांना विमा देण्याची सक्ती करावी.
कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआयची खरेदी केंद्र चालू करण्यात यावे. या सर्व मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रास्ता रोको करून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. मागण्या पूर्ण झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या वेळी देण्यात आला असून स्वाभिमानि शहर अध्यक्ष गोपाल तायडे, सागर महेंगे, अतुल तायडे, सागर भगेवर,
ऋषीं बघे, संकेत मुंडे, विशाल पाखरे, यदी कार्यकर्ते उपस्तित होते.

Leave a Comment