स्मशानभूमी नसल्याने भरपावसात वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार

 

चांगेफळ येथील प्रकार; स्मशानभूमी उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

मागणी न झाल्यास अन्यथा आम्ही गावकरी आमरण उपोषणाला बसू

योगेश नागोलकार
ता.प्रतिनिधी पातूर

पातूर तालुक्यातील चांगेफळ या गाव मध्ये स्मशानभूमीच नसल्याने भर पावसात खुल्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागल्याची बाप समोर आली आहे. चांगेफळ येथील वृद्ध महिला मथुराबाई अमृता सदार 75 यांचे वृद्ध काळाने 19 जुलै रोजी रात्री निधन झाले .चांगेफळ परिसरासह सर्व तालुक्यात पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या वेळेस कसा अत्यंत विधी करावा असे संकट कुटुंबावर आले.तेव्हा पाऊस बंद होण्याची हे कुटुंब वाट बघत होते. सात दिवसांपासून पाऊसाची सततधार सुरू असल्याने भरपावसात प्रेत कशे न्यायाचे हा प्रश्न ग्रामस्थान समोर उभा होता. चक्क ताडपत्रीचा आधार घेऊन कसे सरण रसयाचे व चिंतेला मुखाग्नी कसा द्यायचा हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. चक्क प्लॅस्टिक ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यविधी उरकण्याची वेळ चांगेफळ ग्रामवाशीयावर आली. स्मशानभूमीत शेड व रस्ते उभारावे व प्रेतांची होणारी अवहेलना आता तरी थांबवावी अशी मागणी चांगेफळ येथील नागरिक करीत आहेत. तसेच मागील सात ते आठ वर्षांपूर्वी गावात चांगेफळ येथील कौताबाई वानखेडे या महिलेचे आणि वसंता शिराम बघे या पुरुषांचे पाऊस सुरू असल्याने या दोघांचे मृतदेहाचा अंत्यविधी नदीकाठी करण्यात आला होता. अंत्यविधी झाल्यानंतर काही तासानंतर नदीला पूर आल्यामुळे या दोघांचे प्रेत तसेच पुरामध्ये वाहून गेले तेव्हा सुद्धा गावकऱ्यांनी स्मशानभूमीची मागणी केली होती. तरीसुद्धा आजपर्यंत गावात एकही स्मशानभूमी नाही ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका चांगेफळ येथील गावकरी करीत आहेत.

चौ
जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती
ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया
आम्ही आमच्या स्तरांवरून तातडीने स्मशानभूमीचा अहवाल जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम चांगेफळ येथे सुरू करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

-एसडीओ पातूर

चांगेफळ येथे स्मशानभूमी नसल्याचा प्रस्ताव पंचायत समीती मध्ये आला असेल तर त्या विभागाला कळवून ताबडतोड कार्यवाही करण्यात येईल.

-तहसिलदार पातूर

प्रतिक्रिया
चांगेफळ गावातील स्मशानभूमीचे काम आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे आम्हाला अंत्यविधी करण्याची मोठी अडचण होत आहे.तरी संबंधित विभागाने ताबडतोड स्मशानभूमीचे काम सुरू करावे .अन्यथा आम्ही गावकरी आमरण उपोषणाला बसू.

-गणेश सदार समाजसेवक चांगेफळ

आम्ही आमच्या स्तरावरून ठराव दिला असून जागा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. तरीसुद्धा स्मशानभूमी चांगेफळ येथे व्हायला का उशीर होतोय याला जबाबदार संबंधी विभाग आहे.

-किरण काळे उप सरपंच चांगेफळ

Leave a Comment