स्वाभिमानी’ची खामगाव-शेगाव तालुक्याची नवीन कार्याकरिणी गठीत..
खामगाव – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खामगाव व शेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज ( ता.24 ऑक्टो. 2020) खामगाव येथे पार पडली. या बैठकीत बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही तोकडी आहे. ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने उदार अंतकरणाने हेक्टर ची अट न घालता सरसकट भरीव मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रासाठी हे.25 हजार बागायतीसाठी हे.50 हजार व फळबागांसाठी हे. 1.00 लाख रु नुकसान भरपाई मिळावी, पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी सरकारने भाग पाडावे, कापसाचे केंद्राच्या हमीभावा प्रमाणे खरेदी केंद्र चालू करावे तसेच सोयाबीनचा भाव 6000 रु प्रति क्विं. स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे व कर्ज माफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा. या मागण्यांसाठी येणाऱ्या आठ दिवसांत विदर्भ-मराठवाड्यात ‘स्वाभिमानी’चे वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरून “आर या पार” च्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीत घाटाखालील नव्याने संघटना बांधनी बाबत चर्चा करण्यात आली व संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ अवथळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव व शेगाव तालुक्यात नव्याने गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला..तसेच यावेळी खामगाव व शेगाव तालुक्यातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये घाटाखालील स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासूम शहा,जिल्हा प्रसिध्द प्रमुख पदी सोपान खंडारे, खामगाव तालुका संपर्क प्रमुख पदी आतिष पळसकर,पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी गोपाल ताठे, स्वाभिमानी युवाआघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी संदीप चव्हाण, स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शेख युनिस शेख युसुफ, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी च्या तालुकाध्यक्ष पदी निलेश देशमुख, तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी निलेश गवळी व पि.राजा जि.प.सर्कल प्रमुख पदी विठ्ठल महाले तसेच शेगाव स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी अनिल पा.मिरगे, संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी गजानन राऊत, युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी शिवा म्हसणे यांच्या पुढील सहा महिन्यासाठी निवडी करण्यात आल्या या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..
या बैठकीला युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे,जालना जिल्ह्याचे नेते मयुर बोर्डे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, समाधान भातुरकर,गजानन पटोकार, श्रीकृष्ण काकडे,आनंदा आटोळे,भैय्या वाघ, रमेश कलाम, सोनू इंगळे,यांच्यासह खामगाव व शेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..